शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बँकेतील ३४ कोटींवर डल्ला मारणाऱ्या मुख्य आरोपीला तीन महिन्यांनी अटक

By प्रशांत माने | Updated: October 7, 2022 18:17 IST

बँकेतील ३४ कोटींवर डल्ला मारणाऱ्या मुख्य आरोपीला तीन महिन्यांनी अटक करण्यात आली आहे. 

डोंबिवली : जुलै महिन्यात येथील निवासी एमआयडीसी भागातील आयसीआयसीआय बँकेच्या तिजोरीतील ३४ कोटी रूपयांवर डल्ला मारणारा मुख्य आरोपी तथा बँकेचा लॉकर असिस्टंट मॅनेजर अल्ताफ शेख याला मानपाडा पोलिसांनी बुधवारी कोल्हापूर येथून अटक केली. या गुन्ह्यात त्याला साथ देणारी त्याची बहीण निलोफर हिला देखील ताब्यात घेतले आहे. त्याच्या तीन साथीदारांना यापुर्वीच ठाणे मालमत्ता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. झटपट पैसा कमावण्यासाठी बँक लुटीच्या घटनांवर आधारीत वेब सिरीज पाहून अल्ताफ ने हा चोरीचा कट रचला होता.

८ ते १३ जुलै दरम्यान हा धाडसी चोरीचा प्रकार बँकेत घडला होता. स्थानिक मानपाडा पोलिसांसह या गुन्ह्याचा तपास ठाणे मालमत्ता गुन्हे शाखेचे पोलीस करीत होते. त्यांनी गुन्ह्यातील इसरार कुरेशी, शमशाद खान आणि अनुज गिरी या तिघांना १८ जुलैला मुंब्रा येथील मित्तल मैदानाजवळ सापळ लावून अटक केली होती. परंतु मुख्य सूत्रधार अल्ताफ फरार होता. बँकेच्या तिजोरीतील सुमारे ३४ कोटी रककम लुटण्याचा डाव रचला गेला होता. त्याने ती रोकड एसीच्या छिद्र पाडलेल्या भागातून बँक इमारतीच्या पाठीमागील बाजूला लोटली होती. त्यावर ताडपत्री टाकली होती. मात्र या रकमेतील १२ कोटी २० लाखांची रककम मात्र लुटून नेण्यात चौघांना यश आले होते. तिघांच्या अटकेनंतर मुख्य आरोपी अल्ताफच्या मागावर मानपाडा पोलीस होते. तो आणि त्याची बहिणी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू असल्याची माहीती वरीष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांनी दिली.

अशी केली चोरीअल्ताफ हा ११ वर्षे बँकेत कार्यरत होता. त्यामुळे बँकेचे कर्मचारी, अधिकारी, सुरक्षारक्षक यांचे येणोजाणो तसेच सीसीटिव्ही कुठे आहेत याची माहीती होती. बँक तिजोरी लुटण्याचा निर्णय झाल्यावर लुट केलेली रोकड कुठे ठेवायची हे देखील ठरले होते. रोकड ठेवण्यासाठी त्याने तळोजा येथे बहीण निलोफर हिच्या नावाने एक फ्लॅट खरेदी केला होता. बँक लुटीच्या घटनांवर आधारीत असलेली 'मनी हिस्ट' ही वेबसिरीज पाहून त्याने चोरीचा प्लॅन आखला. तिजोरीतील ३४ कोटींची रोकड चोरण्यापूर्वी तिजोरीचा बारकाईचा अभ्यास त्याने केला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवलीArrestअटकbankबँक