शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

कल्याणमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त साकारली जाणार भव्य श्रीराम मंदिर प्रतिकृती

By मुरलीधर भवार | Updated: February 6, 2024 20:34 IST

शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांची माहिती

कल्याण- माघी गणेशोत्सवानिमित्त कल्याणमध्ये ७० फूटी भव्य श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे. आमदार भोईर यांच्या संकल्पेतून कल्याण पश्चिमेतील श्री कॉम्प्लेक्स परिसरातील आत्माराम भोईर चौकात ही प्रतिकृती साकारली जाईल..आमदार भोईर यांच्या माध्यमातून शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा मंडळाच्या माघी गणेशोत्सवाचे ३० वे वर्ष आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर आ श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील त्यांच्या वेळेनुसार याठिकाणी दर्शनासाठी येणार आहेत. ही प्रतिकृती ४० फूट लांब, ९० फूट रुंद आणि ७० फूट उंच इतकी भव्य आहे. येत्या १३ फेब्रुवारी रोजी माघी गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. पुढील आठवडाभर म्हणजे १९ फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना ही प्रतिकृती पाहता येणार आहे. मंदिरातील रामाचे दर्शन घेता येणार आहे.