शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

लॉकडाऊन म्हटले की पोटात गोळा येतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:12 IST

वर्ष झाले हाताला काम नाही : कुटुंबाच्या गरजा भागवायच्या कशा?

अनिकेत घमंडीलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : हाताला काम नाही, पण घरच्यांच्या अपेक्षा काय कमी असतात का? सरकारला काय ऊठसूट लॉकडाऊन घ्यायला जाते. सामान्यांची अर्थव्यवस्था कोणी बघायची? सरकारी फतवा काढून थोडेच पोट भरते. आता वर्ष झाले हाताला काम नाही. त्यामुळे लॉकडाऊन म्हटले की पोटात गोळा येतो. कोणाकडे दाद मागायची? कोणीच मदतीला येत नाही. त्यामुळे पुन्हा कडक लॉकडाऊन, बाहेर पडायचे नाही हे चालणार नाही. आम्हाला संसार आहे. त्यामुळे ताे चालविण्यासाठी कामधंदा हवाच, असे मत घरकाम करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या महिलांनी व्यक्त केले.गतवर्षी न भूतो असा लॉकडाऊन अगदी मार्चपासून नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत चालला. त्यानंतर अनलॉकचे नियम असे काहीना काही सुरूच आहे, त्यातून मार्ग निघत नाही ताेच लगेच आता पुन्हा लॉकडाऊन, संचारबंदी सुरू झाली हे योग्य नाही, असे मत महिलांनी व्यक्त केले.सरकार धान्य देण्याचे म्हणते, पण ते मिळविताना किती अडचणी येतात.  महागाई वाढत चालली, मुले शाळा नसल्याने शिक्षणाविना मोठी होत आहेत, त्यासोबत त्यांच्या अपेक्षा वाढत असतात. nआईवडिलांकडे नाही तर कोणाकडे ते मागणार? सरकार थोडेच येते गरजा भागवायला. त्यामुळे यापुढे कोरोना असो नसो. लॉकडाऊन नको, असा पवित्रा महिलांनी व्यक्त केला.nशहरात बहुतांशी इमारतींच्या ठिकाणी घरातील धुणी-भांडी, लादी-पोछा करण्यासाठी प्रति कामाचे ५०० ते ७०० रुपये घेतले जातात, साधारणपणे ५ घरांचे काम काही महिला करतात.nअसे करून महिन्याला १० ते १२ हजार रुपये कमावतात. पण, त्यांची ही कमाई वर्ष झाले बंद झाली आहे. त्यात लॉकडाऊन म्हटले की समस्यांत वाढ होणार असल्याने सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

लॉकडाऊन नको, हाताला काम द्या. वर्ष, दीड वर्ष झाले उत्पन्न बंद झाले. मुलाबाळांच्या अपेक्षा, त्यांच्या गरजा पूर्ण कशा करायच्या? सरकार काही देत नाही, एक दोन वेळा अन्नधान्य दिले म्हणजे प्रश्न सुटले असे होत नसते.    - संजना पांचाळमला लॉकडाऊनआधी सुमारे २० हजार रुपये पगारवाली नोकरी होती. पण आता ते काम मिळत नाही. कामाला लावायचे म्हटले तरी काही जण पैसे मागतात. ते कुठून द्यायचे. कसे बसे दिल्यावर पुन्हा लॉकडाऊन लागले आणि नोकरी सुटली तर काय करायचे. खूप तणाव येतो. बस झाले लॉकडाऊन वगैरे. उपाययोजना करा आणि यातून सोडवा.    - सुप्रिया पाटीलसुरुवातीला लॉकडाऊनचे काही वाटले नाही, पण आता दडपण येते. घरात मुली, नवरा आहेत. मुले सगळे माेठे होत आहेत. त्यांना पण परिस्थितीचे गांभीर्य आहे. पण तरीही अपेक्षा असतातच ना? हाताला काम मिळायला हवे. वर्ष झाले. आर्थिक नुकसान कसे भरून काढायचे? सरकार थोडी येणार आहे त्यासाठी.    - वंदना जोशीकर