शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत नालेसफाईला सुरवात नालेसफाई करणाऱ्या कामगारांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 16:18 IST

कल्याण-डोंबिवलीत नालेसफाईला सुरवात मात्र कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्याने कामगारांचा जीव धोक्यात

कल्याण: डोंबिवली  महानगरपालिका हद्दीत नालेसफाई म्हटलं की काही ना काही वाद हा निर्माण होतो. सध्या केडीएमसीत प्रशासकीय राजवट असल्यानं महासभेत नालेसफ़ाईवरून रंगणारा नाट्यमय कलगीतुरा  यंदा पहावयास मिळाला नाही.पावसाळयात शहरातील अनेक भागात  पाणी साचते हा प्रकार तर दरवर्षीचा झालाय.  सध्या शहरात ठिकठिकाणी नालेसफ़ाई सुरू असली तरी  साफसफाई करणा-या कर्मचा-यां ना कोणत्याही प्रकारचे सुरक्षिततेचे  साहित्य पुरविण्यात न आल्याच समोर येतंय. त्यामुळे हे कामगार अक्षरशः जीव धोक्यात घालून काम करत असल्याचं धक्कादायक चित्रं शहरात दिसून येत आबहे.

साफसफाई करणारे हे कामगार आपल्यापैकीच एक नागरिक आहेत. विठ्ठलवाडी परिसर, एमआयडीसी परिसरात  व इतर ठिकाणी नालेसफ़ाईची कामं सुरुयेत. शहरात विहिरी आणि नाल्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडलं जात असल्याच अनेकदा समोर आलंय. इतकेच नाही तर या सांडपाण्यामुळे अनेक दुर्घटना देखील घडल्यात. असे असतानाही साफसफाई करणारे कामगार हे  मास्क न घालता, बूट न घालता, हँड ग्लोज न घालता   नाल्यामध्ये उतरवून  साफसफाई करताना दिसतायेत. या नाल्यात  अक्षरशः हात घालून मोठ्या प्रमाणावर कचरा बाहेर टाकला जातोय. या कच-यांच्या ढिगात काचा व इतर टोकदार साहित्याचा देखील समावेश आहे.  

कल्याण डोंबिवली शहरात एमआयडीसीचे चेंबर साफ करताना आणि कल्याण पूर्वेत विहिरीतील सांडपाण्यामुळे अनेकांना आपला जीव नाहक गमवावा लागलाय. त्यामुळे एमआयडीसी असो वा इतर परिसर नालेसफ़ाई करताना संबंधित कंत्राटदाराने कामगारांच्या सुरक्षिततेचा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. यासाठी यंत्रणांनी देखील कंत्राटदाराला कडक  शब्दात कारवाईचा इशारा देणे आवश्यक आहे अन्यथा एखादा अनुचित प्रकार झाल्यावर लोकप्रतिनिधींचे दौरे व यंत्रणांचे कागदी घोडे नाचविणे हे सर्व प्रकार सुरू होतात आणि यातून गुन्हे दाखल करण्यापलीकडे काहीच निष्पन्न होत नाही. 

टॅग्स :kalyanकल्याणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस