शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-कसारा रेल्वेच्या चौथ्या मार्गिकेसाठी एनआरसी कंपनीची जमीन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 07:19 IST

कंपनीची ४४५ एकर जागा आहे. ही जागा एनआरसी कंपनीकडून अदानी उद्योग समूहाने लिलावात घेतली.

कल्याण : कल्याण-कसारा रेल्वेच्या चौथ्या मार्गिकेचे काम मध्य रेल्वे प्रशासनाकडून लवकर हाती घेतले जाणार आहे. या चौथ्या मार्गिकेसाठी राज्य सरकारच्या महसूल विभागाला भूसंपादन करावे लागणार आहे. या मार्गिकेमुळे आंबिवली नजीकच्या एनआरसी कंपनीची जागा बाधित होणार आहे. ही जागा अदानी कंपनीने खरेदी केली असल्याने संपादित करण्यासाठी महसूल विभागाला कसरत करावी लागणार आहे. 

एनआरसी कंपनी आर्थिक डबघाईला आल्याचे कारण पुढे करीत कंपनी प्रशासनाने २००९ साली कंपनीत टाळेबंदी लागू केली. या कंपनीत काम करणाऱ्या चार हजार कामगारांच्या थकीत देण्याचा प्रश्न दिल्लीतील नॅशनल कंपनी लॉ लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे. 

कंपनीची ४४५ एकर जागा आहे. ही जागा एनआरसी कंपनीकडून अदानी उद्योग समूहाने लिलावात घेतली. कंपनीच्या जागेचा लिलाव झाला असला तरी जागा अद्याप एनआरसी कंपनीच्या नावे आहे. कंपनीकडून कल्याण डोंबिवली महापालिकेस मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी १५० कोटी येणे बाकी आहे. त्यामुळे कंपनीच्या सातबारावर महसूल खात्याकडून महापालिकेचे नाव लावण्याची प्रक्रिया महसूल खात्याकडे प्रलंबित आहे. कंपनीची जागा रेल्वेच्या चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पात बाधित होणार आहे. 

१११ कोटींच्या मोबदल्याचे वाटपमहसूल विभागाने कल्याण ते कसारा या तिसऱ्या मार्गिकेच्या  प्रकल्पाकरिता लागणारी भूसंपादनाची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण केली आहे. बाधितांचे न्यायनिवाडे केले असून बाधितांना १११ कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वाटपही केले आहे. तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम मार्च २०२० मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले होते. मात्र त्याची पूर्तता झाली नाही. कारण भूसंपादनाचा विषय मार्गी लावणे बाकी होते. आता चौथ्या मार्गिकेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्याकरिता लागणाऱ्या जमिनीची मोजणी प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया केली जाईल. भूसंपादनासाठी बाधितांच्या मोबदल्याच्या रकमेची तरतूद आवश्यक आहे.  तरतूद होताच भूसंपादनाची प्रक्रिया गतीने सुरू करता येईल, असे  महसूल विभागाकडून सांगण्यात आले.