शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

क्राईम ब्राँचच्या रडारवर लेडिज सर्व्हिस बार; धाडसत्र सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 19:33 IST

आणखी एका बारवर कारवाई 

- मयुरी चव्हाण  कल्याण क्राईम ब्राँचने कल्याण पुर्वेतील हाजीमलंग रोड येथील एका बार वर कारवाई केली असल्याच वृत्त ताज असताना पुन्हा एकदा क्राईम ब्राँचने अजून एका बारवर धाड टाकली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही बार मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे  मानपाडा पोलिसांचा याकडे कानाडोळा झाला असताना क्राईम ब्राँचच्या लागोपाठ सुरू असलेल्या  धाडसत्रामुळे लेडीज सर्व्हिस बार हे क्राईम ब्राँचच्या रडारवर असल्याचं दिसून येतं.  

काही दिवसांपूर्वी कल्याण पुर्वेतील मोनालीसा बार येथे कारवाई करत 56 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. ग्राहकांना  सर्व्हिस देण्याकरता तोकड्या कपड्यातील महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील कृत्य व हावभाव करत असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली.त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ही घटना ताजी असताना पुन्हा 15 सप्टेंबर रोजी लोटस बार अँड रेस्टॉरंटवर क्राईम  ब्राँचनं धाड टाकली आहे. या कारवाई दरम्यान  10 महिला व 19 ग्राहकांना ताब्यात घेण्यात आलं असून सुमारे 25 हजरांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. मानपाडा रोडवर असलेल्या या बारचे मालक व चालक दोघेही विना नोकरनामा व परवाना नसताना  बारमध्ये ग्राहकांना लेडीज सर्व्हिस देऊन  आकर्षित करत आहेत तसेच महिलांना तोकडे कपडे परिधान करून अश्लिल कृती व  हावभाव केले जात असल्याची खात्रीपूर्वक माहिती क्राईम ब्राँचला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर ही धाड  टाकण्यात आली आहे. तसेच  गाणी वाजवण्याकरता असलेला मिक्सर , एम्प्लिफायरही जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे लेडीज सर्व्हिस बारच्या नावाखाली छमछम व इतर  अनैतिक धंदे सुरू असल्याचं पुन्हा एकदा उघड झाल आहे. 

विशेष बाब म्हणजे कारवाई करण्यात आलेले दोन्ही बार मानपाडा पोलीस  स्टेशनच्या हद्दीत   असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केल जात आहे. आगामी काळात तरी आपल्या हद्दीत सुरू  असलेल्या  छमछमचा आवाज मानपाडा पोलिसांना ऐकू येईल का? हाच प्रश्न आहे. दरम्यान  15 सप्टेंबरला बारवर  कारवाई करण्यात आली या वृत्ताला कल्याण क्राईम ब्राँचनही दुजोरा दिला आहे.