शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या निर्बंधाबाबत केडीएमसीचा दुजाभाव, कोरोना आमच्यामुळेच पसरतो का? फेरीवाल्यांमध्ये पसरला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 02:26 IST

केडीएमसी हद्दीत कोरोनाचे दिवसाला ९०० रुग्ण आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमधील गर्दी कमी करण्यासाठी मनपाने सर्व दुकाने व आस्थापने शनिवार, रविवारी बंद ठेवण्याचा आदेश काढला होता; मात्र व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर आयुक्तांनी हा आदेश मागे घेतला.

कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोनाचे दिवसाला ९०० रुग्ण आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमधील गर्दी कमी करण्यासाठी मनपाने सर्व दुकाने व आस्थापने शनिवार, रविवारी बंद ठेवण्याचा आदेश काढला होता; मात्र व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर आयुक्तांनी हा आदेश मागे घेतला. परंतु, फेरीवाल्यांना या दोन दिवशी व्यवसाय बंद ठेवण्याचा आदेश आयुक्तांनी कायम ठेवला आहे. आयुक्तांच्या या आदेशातून प्रशासन फेरीवाल्यांसोबत दुजाभाव करीत असून कोरोना केवळ फेरीवालेच पसरवित आहेत का, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. भाजीपाला व फेरीवाला कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष  प्रशांत माळी यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. आयुक्तांनी सर्व दुकाने, आस्थापना शनिवार आणि रविवारी बंद करण्याचा निर्णय होळीच्या अगोदर घेतला होता. दुकानदारांनी शनिवारचा बंद पाळला. मात्र, होळीला सूट देण्याचा आग्रह धरला.  त्यावेळी एक दिवसाची सूट देत शनिवारी, रविवारी सर्व दुकाने बंदच राहतील, या मुद्यावर आयुक्त ठाम होते. त्यानंतर  सर्व दुकाने शनिवारी, रविवारी सुरू राहतील, असे आदेश काढले. मात्र फेरीवाल्यांना रविवारी, सोमवारी बंद ठेवण्यास सांगितले आहे.  ‘मग आमच्या पोटावर पाय का?’  फेरीवाल्यांचे पोट हातावरचे आहे. मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लागू केल्याने फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यातून आता कुठे ते सावरत असताना त्यांच्यावर निर्बंध घालणे म्हणजे फेरीवाल्यांवर प्रशासनाचा अन्याय आहे.  रेस्टाॅरंट, हॉटेल, बार यांना जास्तीची वेळ दिली आहे. दारूची दुकाने उघडी ठेवण्यास मुभा आहे. मात्र, आम्हाला पोट भरू दिले जात नाही, याकडे फेरीवाल्यांनी लक्ष वेधले आहे. १० हजारांपेक्षा जास्त फेरीवाले असून, त्यांच्यावरील निर्बंध हटवावेत. सोशल डिस्टन्सिंग पाळून फेरीवाले धंदा करण्यास तयार आहेत. या मागणीचा विचार प्रशासनाने न केल्यास आम्ही आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिका