शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या ८०० कोटींच्या प्रकल्पांना लवकरच मान्यता? आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 09:15 IST

KDMC: नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेस भेट दिली. यावेळी महापालिकेने ८०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे सादरीकरण केले.

कल्याण : नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेस भेट दिली. यावेळी महापालिकेने ८०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे सादरीकरण केले. त्यांपैकी ४७७ कोटींच्या विकास प्रकल्पांना सरकारकडून यापूर्वी मंजुरी मिळाली आहे. उर्वरित ३०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची मंजुरी सरकारदरबारी अंतिम टप्प्यात असल्याची व पुढील दहा दिवसांत मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. 

प्रधान सचिव सेठी यांनी दुपारी महापालिकेस भेट दिली. स्थायी समितीच्या दालनात महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांची त्यांच्यासोबत दोन तास बैठक झाली. बैठकीत महापालिका हद्दीतील प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये स्वच्छ भारत मिशन, अमृत योजनेचा टप्पा क्रमांक दोन आणि घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, रस्ते विकास आणि पाणी योजना यांचा समावेश होता. मंजुरी न मिळालेल्या  प्रकल्पांना येत्या दहा दिवसांत मान्यता मिळू शकते, असा विश्वास आयुक्त दांगडे यांनी व्यक्त केला. 

१५ व्या वित्त आयोगांतर्गत महापालिकेस ९० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून ४० कोटींची कामे झालेली असून ५० कोटींच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

    सत्तांतर होण्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षांत जवळपास ५०० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली होती, असा दावा तत्कालीन सरकारने केला होता.    माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेस १०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते.    सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस यांच्या सरकारकडून महापालिकेस जवळपास २०० कोटी रुपयांचा विकासनिधी प्राप्त होणार असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांची बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

प्रलंबित विषय मार्गी लागणार - सेठीठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास विभागाचे संपूर्ण लक्ष मुंबई महानगर प्रदेशातील महापालिकेकडे असल्याने येथील प्रलंबित विषय प्राधान्याने मार्गी लागतील, असा विश्वास नगरविकासच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. ठाणे, भिवंडी, पनवेल, उल्हासनगर आणि वसई - विरार या पाच महापालिकांच्या, नगरविकास विभागाकडील विषयांचा आढावा घेण्यासाठी सेठी शुक्रवारी ठाण्यात आल्या होत्या. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, प्रकल्प, शहर सुशोभीकरण अभियान, नगरविकास विभागाकडील प्रलंबित विषय, तसेच, विविध समस्या यांच्याविषयी सेठी यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली