शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

क्लस्टर योजने प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केडीएमसीकडून केराची टोपली; भाकप आणि लाभार्थ्यांनी काढला केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:23 IST

अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करा : क्लस्टर योजना तातडीने राबवा, आंदोलकांची मागणी 

कल्याण: डोंबिवली पूर्वेतील आयरे दत्तनगर येथे क्लस्टर योजना राबविली जात आहे. या याेजनेकरीता लाभार्थींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. योजना राबविण्याकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डाेंबिवली महापालिकेस आदेश दिले आहे की, योजनेकरीता विकासक नेमण्यात यावा. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचीही महापालिका प्रशासनाकडून पायमल्ली केली जात असल्याच्या निषेधार्थ केडीएमसी मुख्यालयावर भाकपच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माेर्चेकऱ्यांनी केली.

भाकपचे पदाधिकारी सुनिल नायक यांनी सांगितले की, महापालिकेने ४१ ठिकाणी क्लस्टर योजना राबविणार आहे. ४१ ठिकाणांपैकी कल्याणमधील का्ेळसेवाडी आणि डोंबिवली पूर्वेतील आयरे दत्तनगर या ठिकाणी सगळ्यात प्रथम ही योजना राबविली जाणार आहे. आयरे दत्तनगरात क्लस्टर योजनेकरीता २५०० लाभार्थींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. उर्वरीत लाभार्थींचे सर्वेक्षण प्रलंबित आहे. त्यांचे देखील सर्वेक्षण करण्यात यावे. ज्यांचे सर्वेक्षण झाले आहे. सर्वेक्षण करताना धोकादायक इमारतीमधील नागरीकांना आणि ज्या धोकादायक इमारती पाडल्या गेल्या. ज्यांना भाेगवटा प्रमाणपत्र दिले गेले आहे. त्यांना प्राधान्य द्यावे. ज्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यांच्या याद्या अपलोड केल्या पाहिजेत. 

या संंदर्भात २०१४ साली तत्कालीन पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे बैठक पार पडली. त्याला देखील दोन वर्षे उलटून गेली. क्लस्टर योजना राबविण्याकरीता भाकप आणि लाभार्थी २०१५ सालापासून पाठपुरावा करुन वारंवार आंदोलन करीत आहेत. तरी देखील प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यापूर्वी महापालिका प्रशासनास आदेश दिले आहे की, आयरे दत्तनगरातील क्लस्टर याेनजेकरीता विकासक नेमण्यात यावा. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन त्याला तीन महिने उलटले. तरी देखील महापालिका त्याची दखल घेत नाही. हा मुख्यमंत्र्यांचा अवमान आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पत्र दडवून ठेवणारा अधिकारी कोण आहे ? त्याच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. 

यासंदर्भात सोमवारी आयुक्त अभिनव गोयल आणि कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी बैठक घेतली. या बैठकीतही ठोस माहिती दिली गेली नाही. अखेरीस लाभार्थी आणि भाकपला केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढावा लागला आहे. क्लस्टर याेजना राबवून गोर गरीबांना घरे द्यायची आहे की नाहीत ? की त्यांच्या डोळ्यात धूळ फेक करुन त्यांची फसवणूक करायची आहे असा संतप्त सवाल लाभार्थांनी उपस्थित केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : KDMC Ignores CM's Cluster Scheme Order; Protest Erupts at Headquarters

Web Summary : Kalyan-Dombivli Municipal Corporation (KDMC) faces protests for neglecting the Chief Minister's order to appoint a developer for the Ayre Dattanagar cluster scheme, despite beneficiary surveys and repeated appeals since 2015. Activists demand action against officials delaying the project and implementing the scheme for the poor.
टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका