शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

५० चाळींना केडीएमसीची नोटीस, कचरा उघड्यावर टाकल्यास दंड वसूल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 17:55 IST

कल्याण डोंबिवलीत राबवली जातेय शून्य कचरा मोहीम. कचरा उघड्यावर टाकल्यास दंड आकारणार, पालिकेचा इशारा.

ठळक मुद्देकल्याण डोंबिवलीत राबवली जातेय शून्य कचरा मोहीम.कचरा उघड्यावर टाकल्यास दंड आकारणार, पालिकेचा इशारा.

कल्याण-कल्याणडोंबिवली महापालिकेकडून शून्य कचरा मोहिम राबविली जात आहे. मात्र अनेक ठिकाणी चाळीत राहणारे नागरिक कचरा वर्गीकरण करुन घंडा गाडीकडे देत नाही. कचरा उघड्यावर टाकतात. कचरा उघडय़ावर टाकल्यास दंड आकारण्यात येईल असा इशारा महापलिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. महापालिकेने ५० चाळींना कारवाईचा इशारा देणारी नोटीस बजावली आहे.

महापालिकने मे २०२० शून्य कचरा मोहिम सुरु केली. ही मोहिम सुरु केली तेव्हा महापालिकेच्या घनकचरा विभागाने विविध ठिकाणच्या कचरा कुंड्या काढल्या. कचरा गाडीकडे जमा केला पाहिजे. तो कुंडीत टाकता कामा नये असा त्यामागचा उद्देश होता. अनेक बड्या सोसायट्यांना ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचे प्रकल्प सोसायटी पातळीवर सुरु करा असे सांगितले. त्याचबरोबर कचरा वर्गीकरणासाठी वेगवेगळ्या युक्त्या अवंलबिल्या. कपडे स्वरुपातील कचरा गोळा वेगळ्य़ा प्रकारे गोळा करुन वापरण्याजोग्या कपडय़ातून कापडी पिशव्या तयार केल्या. त्यातून महिला बचत गटांच्या हाताला काम मिळाले. 

रबर,  प्लास्टीक, काचा आदी वेगळे गोळा करण्याचे वार ठरवून दिले. प्लास्टीक कचरा वेगळ्य़ा पद्धतीने गोळा करुन तो रियकलींगला दिला. तसेच माणूसकीच्या भिंतीचा उपक्रम सुरु केला. हे सगळे सुरु असताना अखेरीस आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करण्याच्या उद्दीष्टापर्यंत महापालिका पोहचली. आत्ता महापालिकेने चाळीतील घरांमधून गोळा होणारा कचरा वर्गीकरण करुन येत नाही. तो उघडय़ावर टाकला जातो. तो उघडय़ावर टाकण्याऐवजी चाळीत राहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या घरातील कचरा वर्गीकरण करुन तो घंडागाडीकडे जमा केला पाहिजे. घंडागाडी दोन वेळा चाळ परिसरात येणार आहे. गाडी येऊनही कचरा उघडय़ावर टाकल्यास कचरा उघड्यावर टाकणाऱ्यास सुरुवातीला प्रत्येकी दंड आकारला जाईल अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली आहे. ही कारवाई करण्यासाठी कल्याण पश्चिमेतील आणि डोंबिवली पश्चिमेतील जवळपास ५० चाळींना नोटीसा देऊन कारवाईचा इशारा दिला आहे.

ग्रामीण भागात कचरा पडूनचकल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमधील कचरा उचलला जात नाही. तो ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला पडून असतो. ग्रामीण भागात शून्य कचरा मोहिम राबविली जात नसल्याचे चित्र पाहावयास मिळते. त्याठिकाणी महापालिकेकडून कचरा उचलला जात नाही अशी माहिती माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली