शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आरटीआय कार्यकर्त्याला घाबरून केडीएमसीने स्वच्छतागृह तोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 11:21 IST

शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुरू होते बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या उर्दू शाळेला स्वच्छतागृह नसल्याने एका माजी नगरसेवकाच्या पुढाकाराने स्वच्छतागृह बांधण्यास सुरुवात केली. मात्र, या स्वच्छतागृहाची तक्रार एका आरटीआय कार्यकर्त्याने केली. त्या बदल्यात पैशांची मागणीही केली. पालिकेच्या सहायक आयुक्तांनी आरटीआय कार्यकर्त्याला घाबरून बांधण्यात येणारे स्वच्छतागृह तोडून टाकल्याची घटना समोर आली आहे. 

कल्याण पूर्वेतील पत्रीपुलाजवळ पालिकेची गफूर डोन ही उर्दू माध्यमाची शाळा आहे. या शाळेतील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. ही समस्या लक्षात घेता माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यास सांगून विद्यार्थ्यांची गैरसाेय दूर करण्याकरिता स्वच्छतागृह बांधण्यास सांगितले. सादिक शेख यांनी स्वच्छतागृहाचे काम सुरू केले. स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू असताना एका आरटीआय कार्यकर्त्याने तक्रार केली. तक्रार मागे घेण्यासाठी काही रक्कम ठरली. तक्रारदाराला पैसे मिळाले नसल्याने त्याने स्वच्छतागृहावर कारवाईसाठी तगादा सुरू ठेवला. महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त सविता हिले यांनी स्वच्छतागृहाचे बांधकाम जेसीबी लावून पाडून टाकले. अधिकाऱ्यांवर वचक राहिला नसल्याचा आरोप नगरसेवक कैलास शिंदे यांनी केला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता