शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan: वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे वाचले २६ विद्यार्थ्यांचे प्राण

By मुरलीधर भवार | Updated: December 20, 2024 21:54 IST

Kalyan News: कुर्ला येथे मद्यधुंद चालकाने बस चालविल्याने झालेल्या अपघातात अनेकांना प्राण गमावावे लागले. ही घटना ताजी असताना उल्हासनगरातून विरारला एक खाजगी बस विद्यार्थ्यांना घेऊन चालली होती.

- मुरलीधर भवार कल्याण - कुर्ला येथे मद्यधुंद चालकाने बस चालविल्याने झालेल्या अपघातात अनेकांना प्राण गमावावे लागले. ही घटना ताजी असताना उल्हासनगरातून विरारला एक खाजगी बस विद्यार्थ्यांना घेऊन चालली होती. या खाजगी बसचा चालक बस वेडीवाकडी चालवित असल्याचे पोलिसाच्या लक्षात आल्याने पोलिसाने त्याला रोखले. बसचा चालक मद्यधुंद असल्याने त्यांच्या ताब्यातील बस पोलिसांनी जप्त केली. मद्यधुंद बस चालकाला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे २६ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहे. वाहतूक पोलिसांनी बजावलेल्या कर्तव्य दक्षतेचे शहरात कौतूक केले जात आहे.

आज सायंकाळी एका खाजगी बस उल्हासनगर येथील जग्गू फुटबॉल अकॅडमीतील २६ लहान मुलांना घेऊन विरारला जाण्यासाठी निघाली होती. बसमधील लहान मुले विरारच्या ग्लोबल स्कूल येथे फुटबॉल खेळण्यासाठी जाणार होती. उल्हासनगरातून निघालेली ही बस वालधूनी पूल उतरून कल्याणच्या सुभाष चौकात आली. बस चालक बस वेडीवाकडी चालवित होता. ही बाब सुभाष चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम करणारे वाहतूक पोलिस सुरेश पाटील यांच्या निदर्शनास आली. तात्काळ पोलिस पाटील यांनी बसच्या चालकाला हात दाखवून ती जागीच थांबविण्यास सांगितले. बस चालकाने बस थांबविली. तेव्हा पोलिस पाटील हे बस चालकाजवळ केले. बस चालकाने मद्यसेवन केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बस चालक सुरेंद्र प्रसाद गाैतम यांची ब्रेथ अ’नालायझर टेस्ट केली. त्यातही तो मद्य प्राशन केल्याचे उघड झाले. ही बाब अतिशय गंभीर असल्याने पोलिस पाटील यांनी बस चालकाच्या ताब्यातील बस जप्त केली.

बस चालकास दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी बस चालकाला उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याने दंड भरला तर त्याच्या ताब्यातील बस सोडण्यात येणार आहे अशी माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेश शीरसाट यांनी दिली आहे. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणtraffic policeवाहतूक पोलीस