शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पिण्यासाठी पाणी न दिल्यानं टोळक्याकडून घरात घुसून मारहाण; शेजारच्या ६ गाड्या फोडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 15:46 IST

स्थानिक गावगुंडांनी मारहाण, तोडफोड केल्याचा आरोप; पोलिसांकडून शोध सुरू

कल्याण: कल्याण पूर्व भागातील खडेगोळवली परिसरात एकाच्या घरात घुसून सामानाची तोडफोड केली आहे. त्याचबरोबर सहा गाड्या फोडण्यात आल्या आहेत. आईस्क्रीमवाल्याकडे पाणी मागितले. त्याने दिले नाही म्हणून हा प्रकार घडला आहे. ही मारहाण, तोडफोड ही स्थानिक गावगुंडांकडून करण्यात आल्याची फिर्यादी महिलेचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करुन घेत तपास सुरु केला आहे.खडेगोळवली परिसरात राहणारे रवी म्हात्रे व त्यांच्या पत्नी पार्किंगचा व्यवसाय करतात. त्याच जागेत ते एक वडापावची गाडी चालवतात. त्यांच्या शेजारी असलेल्या आईस्क्रीमवाल्याकडे काही तरुण आले. त्यांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्याला त्यांनी दमदाटी केली. त्याच्या मदतीला लता म्हात्रे धावल्या. त्यानंतर ते तरुण परत गेले. मात्र रात्री ते दहा ते पंधरा जण पुन्हा आले. त्यांनी म्हात्रे यांच्या घरात घुसून साहित्याची तोडफोड केली. तसेच सहा गाड्या फोडल्या. या दरम्यान म्हात्रे यांच्या घरातील दागिने व रोकड लंपास आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक शाहूराज साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आईस्क्रीमवाल्याकडे तरुणांनी पिण्याकरीता पाणी मागितले होते. या कारणावरुन ही घटना घडली आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून पुढील तपास सुरू आहे. कालच कल्याण पूर्वेला ज्वेलर्सला बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा उपरोक्त घटना घडल्याने कल्याणमध्ये नेमके चालले आहे काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.