शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:54 IST

Kalyan Dombivli Municipal Corporation Election: मुंबईजवळच्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वीच भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने अर्धी लढाई जिंकल्याचं चित्र दिसत आहे. येथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत महायुतीच्या तब्बल १९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

मुंबईजवळच्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वीच भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने अर्धी लढाई जिंकल्याचं चित्र दिसत आहे. येथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत महायुतीच्या तब्बल १९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. उद्धवसेना, काँग्रेस, अपक्ष आणि मनसेच्या उमेदवारांकडून अर्ज मागे घेण्यात आल्याने महायुतीच्या अनेक उमेदवारांचा निवडणूक न लढवताच महानगपालिकेत प्रवेश झाला आहे. बिनविरोध निवड झालेल्या महायुतीच्या १९ उमेदवारांमध्ये भाजपाच्या १३ आणि शिंदेसेनेच्या ६ उमेदवारांचा समावेश आहे. 

१२२ सभासदसंख्या असलेल्या कल्याण डोंबवली महानगरपालिकेमध्ये उमेदवारी अर्जांची छाननी सुरू झाल्यापासूनच अनेक प्रभागांमधील लढती बिनविरोध होण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान, भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीसमोर उभ्या असलेल्या उद्धवसेना आणि मनसेच्या काही उमेदवारांनी एकापाठोपाठ माघार घेतल्याने आतापर्यंत महायुतीच्या तब्बल १९ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

बिनविरोध निवडून आलेल्या भाजपाच्या उमेदवारांमध्ये  रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर, रवीना माळी, सुनिता पाटील, साई शेलार, महेश पाटील, पूजा म्हात्रे, दीपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे, मंदा पाटील, हर्षदा भोईर, विशू पेडणेकर यांचा समावेश आहे. यापैकी भाजपाचे रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर हे उमेदवार सुरुवातीलाच बिनविरोध निवडून आले होते. तर उर्वरित उमेदवार हे उमेदवार नंतरच्या टप्प्यात बिनविरोध निवडून आले.

भाजपा प्रमाणेच शिंदेसेनेच्याही सहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. बिनविरोध निवडणून आलेल्या शिंदेसेनेच्या उमेदवारांमध्ये हर्षल मोरे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी, रमेश म्हात्रे, ज्योती मराठे आणि रेश्मा निचळ यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाShiv Senaशिवसेना