शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणून संतापलेल्या रिक्षाचालकांनी घातला वाहतूक पोलिसांना घेराव, वाचा नक्की काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 14:14 IST

रिक्षाचालकांचा पारा चांगलाच चढल्याचं दिसून आलं होतं.

मयुरी चव्हाण 

कल्याणडोंबिवली शहरात रिक्षाचालक, प्रवासी आणि वाहतूक पोलीस यांच्यात नेहमीच शाब्दीक चकमक उडत असते. त्यातच आता ई चलान प्रक्रियेमुळे नवीन वाद  निर्माण होताना दिसत आहेत. मंगळवारी  सकाळी  डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौक परिसरात रिक्षा चालकांनी  वाहतूक पोलिसांना घेराव घातल्याचं पाहायला मिळालं. एका रिक्षाचालकाला दोन तासात एकाच वाहतूक कर्मचाऱ्याने दोन फाईन मारल्यानं रिक्षाचालकांचा पारा चांगलाचं वाढला होता. काही काळ या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर रिक्षाचालकांनी आपला मोर्चा वाहतूक शाखेच्या कार्यालयात वळवला. मार्च एडिंगमुळे अशा कारवाया होतात असा आरोपही रिक्षा चालकांकडून करण्यात आला.दिनेश मेहता नावाच्या रिक्षाचालकाला दोन तासात दोन फाईन ई चलान प्रक्रियेच्या माध्यमातून आकारण्यात आले. यानंतर मंगळवारी सर्व रिक्षाचालक इंदिरा चौकात जमा झाले. यावेळी उपस्थित असलेल्या  वाहतूक कर्मचाऱ्यांना घेराव घालून दंडाबद्दल जाब विचारण्यात आला. रिक्षाचालकांच्या बाजू कोणीच विचारात घेत नाहीत अशी खंत ही यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर वाहतूक विभागाच्या कार्यालयात रिक्षाचालकांनी आपला  मोर्चा वळवला. 

ई चलान बाबत अनेक तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या. तसेच  फ्रंट सीटचा नियम केवळ सकाळी लागू केला जातो. संध्याकाळी गर्दी असल्याने डोळेझाक केली जाते. मग सकाळी वेगळा नियम गर्दी असल्यावर वेगळा नियम का? असा सवालही विचारण्यात आला. अशा पद्धतीने फाईन लावला गेला तर आम्ही कमवायचा किती ? घर कसं चालवायचं आणि  फाईन तरी किती भरायचा? अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती यावेळी करण्यात आली.  

दोन तासात एकाच कर्मचाऱ्याकडून एका रिक्षाचालकाला दोन फाईन मारण्यात आले. कमवायचे किती आणि दंड भरायचा तरी किती? हे सर्व थांबलं नाही तर वाहतूक शाखेवर  मोर्चा काढू. केवळ मार्च एडिंगचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. दत्ता माळेकर,  भाजप प्रणित रिक्षाचालक मालक संघटना 

ई चलानबाबत जनजागृती करण्यासाठी एक मेळावा आयोजित करण्यात येईल. डिजिटल प्रक्रिया असल्याने फाईन सोबत फोटोही जोडला जातो. तरी याबाबत अधिक चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल. उमेश गित्ते पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीauto rickshawऑटो रिक्षा