शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

ऐकावे ते नवलच! कॉलेजने  कामचुकार प्राध्यापकांचीच यादी गेटवर लावली, शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 05:24 IST

अग्रवाल कॉलेजचा प्रताप : शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कमी उपस्थिती असल्यास विद्यार्थ्यांना परिक्षेला बसू दिले जात नाही. मात्र, कमी लेक्चर घेणाऱ्या प्राध्यापकांची यादीच के. एम. अग्रवाल कॉलेजने प्रवेशद्वारात झळकविली आहे. त्यामुळे विषय शैक्षणिक क्षेत्रात चर्चेचा ठरला आहे.

कल्याण पश्चिमेला के. एम. अग्रवाल हे नामांकित कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये जुनिअर आणि पदवीचे विविध शाखेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सहा हजार ५०० इतकी आहे. या कॉलेजमध्ये जुनिअर आणि सिनिअरला मिळून १२५ प्राध्यापक विद्यादानाचे काम करीत आहे. त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या १०० आहे. कोरोनाकाळात कॉलेज बंद होते. ऑनलाइन शिक्षण सुरू होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच ऑफलाइन शिक्षण सुरू झाले. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांची कमी उपस्थिती आणि त्यांच्या शैक्षणिक अनियमिततेविषयी विविध नोटिसा कॉलेजकडून काढल्या जातात. त्याच प्रमाणे कॉलेजने ज्युनिअर कॉलेजच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या सहा प्राध्यापकांच्या नावाची यादीच कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ लावली आहे. या प्राध्यापकांनी जुलै ते नोव्हेंबर दरम्यान कमी लेक्चर घेतले आहे. हा फलकच विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे.

कॉलेजची शैक्षणिक कामगिरी चांगली - पांडेप्राचार्या अनिता मन्ना यांनी सांगितले की, हा आमच्या कॉलेजच्या अंतर्गत विषय आहे. संबंधित प्राध्यापकांकडून कमी लेक्चर का घेतले याचा खुलासा मागविला आहे. त्यांचे खुलासे त्यांनी आम्हाला सादर केले आहेत. तर कॉलेजचे जॉईन सेक्रेटरी ओमप्रकाश पांडे यांनी सांगितले की, आमच्या कॉलेजची शैक्षणिक कामगिरी चांगली आहे. विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी जास्त आहे.

समज देणे हा उद्देशप्राध्यापक कमी लेक्चर घेत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना एक समज देण्यासाठी व त्यांच्या कामगिरीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्या नावाचा फलक लावला. त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही. त्यांच्या कामात सुधारणा होणे हेच यातून अपेक्षित आहे. कमी लेक्चर घेणाऱ्या एका प्राध्यापकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या संदर्भात मी काही बोलू शकत नाही, एवढीच प्रतिक्रिया दिली. 

टॅग्स :kalyanकल्याण