शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

सेना-भाजपच्या जुगलबंदीने गाजलेल्या कोपर उड्डाणपुलावर अवघ्या ४८ तासात पडला खड्डा, महापालिका, शिवसेनेची सारवासारव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 18:11 IST

KDMC News: शिवसेना भाजपच्या जुगलबंदीने गाजलेल्या कोपर उड्डाणपुलाचे  दोन दिवसांपूर्वीच मंगळवारी मोठ्या दिमाखात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ झाला होता. मात्र अवघ्या ४८ तासात या पुलावर पहिला खड्डा पडला

डोंबिवली - शिवसेना भाजपच्या जुगलबंदीने गाजलेल्या कोपर उड्डाणपुलाचे  दोन दिवसांपूर्वीच मंगळवारी मोठ्या दिमाखात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ झाला होता. मात्र अवघ्या ४८ तासात या पुलावर पहिला खड्डा पडला असून त्याचे फोटो, व्हिडीओ नागरिकांनी समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल केले. अल्पवधीतच शेकडो नागरिकांनी उपहासाने महापालिकेचे अभिनंदन करून त्या खड्ड्याचे चला पहिला खड्डा पडला असे म्हणत टीकास्त्र केले. त्याची दखल घेत महापालिकेचे अधिकारी पुलावर गेले आणि अवघ्या काही तासातच त्यांनी तात्पुरता खड्डा बुजवण्याचा।केविलवाणा प्रयत्न केला. 

हा पूल सुरू होण्याची डोंबिवलीकर आतुरतेने वाट पहात होता. मंगळवारी पुलाचे उदघाटन झाल्यानंतर वाहनचालकांनी याचा वापर करण्यास सुरुवात केली. मात्र पूल सुरू होऊन दोन दिवस होत नाही तोच पुलावर खड्डे पडले आहेत. यावरून आता गाजावाजा करीत उदघाटन करणाऱ्या महापालिका प्रशासनाला व सत्ताधारी शिवसेनेला नागरिकांनी  ट्रोल केले. त्या खड्ड्याचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल करीत, पुलाचे व्हिडीओ व्हायरल करीत महापालिका प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मनसेने सोडली नाही संधीखड्डा पडल्याचे समजताच मनसे आमदार राजू पाटील व कार्यकर्ते पुलाच्या पाहणीसाठी आले. आमदार पुलावर पोहोचण्याआधीच पालिका अधिकाऱ्यांनी खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला. त्यावर जी तत्परता हा खड्डा भरण्यास प्रशासनाने दाखवली, तेवढीच तत्परता शहरातील इतर खड्डे भरण्यात दाखवावी. खड्डे भरण्यासाठी १७ कोटीचा निधी आहे त्याचा वापर करावा आणि चांगले रस्ते नागरिकांना द्यावेत अशी खरमरीत टीका त्यांनी केली. चांगल्या कामाला कसे गालबोट लावायचे हे काही पक्षांचे काम आहे. ते केवळ पाहणीच करू शकतात, विधायक कामे करू शकत नाहीत असा प्रति टोला शिवसेनेने मनसेला लगावला. पुलावरील जॉईंट हे काँक्रीट चे आहेत त्यावरील डांबर निघाले होते. शेवटच्या टप्प्यातील डांबरीकरणाचे काम शिल्लक असल्याचे कारण सांगत शिवसेनेने सारवासारव करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

त्या पुलावरील डांबरीकरणामध्ये मास्टीक अस्फाल्टचा अंतर्भाव असतो. परंतू मास्टीक अस्फाल्टचे काम पूर्ण होण्यासाठी साधारणत: एक महिन्याचा कालावधी लागतो आणि यासाठी कडक उन्हाची आवश्यक असते. गणेशोत्सवापूर्वी सदर पूल वाहतूकीस सूरु करण्यात यावा आणि नागरिकांना सुविधा देण्यात यावी या हेतूने मास्टीक अस्फाल्टचे काम प्रलंबित ठेवण्यात आले आणि अस्फाल्टींग बिटूमनचा एक थर देऊन उड्डणपूल वाहतूकीस सुरु करण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेचे नेते।देत होते.

ते काम करताना मोठया प्रमाणात पर्जन्य वृष्टी होत होती त्यामुळे कोपर पूलावर काही ठिकाणी खड्डे पडणे अपेक्षित होते. गुरुवारी पडलेला खड्डा हा रेल्वेच्या एक्स्पाशन जॉइंटच्या बाजूला आहे. तो तातडीने भरुन घेतला असून वाहतूक सुरळीत चालू राहील याची दक्षता घेण्यात आली आहे. दस-यानंतर पावसाची उघडीप मिळाल्यावर कडक उन्हात मास्टीक अस्फाल्टचे काम सुरु करण्यात येणार आहे. -  सपना देवनपल्ली कोळी, शहर अभियंता, केडीएमसी

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली