शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या १५ महिन्यांच्या अन्वीचा सुरू आहे दुर्मीळ आजाराशी लढा, उपचारासाठी १८ कोटी रुपयांची गरज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 12:07 IST

आरती आणि सूरज यांचे अन्वी हे पहिले अपत्य आहे. अन्वीला हा आजार असल्याचे मागील आठवड्यात त्यांना समजले. तिच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कल्याण: पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या आरती सूरज वाव्हळ यांची १५ महिन्यांची मुलगी अन्वी स्पायनल मसक्युलर अन्थ्रपी (एसएमए) या दुर्मीळ आनुवंशिक आजाराने ग्रस्त आहे. या आजाराच्या उपचारासाठी जवळपास १८ कोटी रुपयांची गरज आहे. अन्वीचे आई-वडील सामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना उपचारासाठीची इतकी मोठी रक्कम उभारणे शक्य नसल्याने त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे.आरती आणि सूरज यांचे अन्वी हे पहिले अपत्य आहे. अन्वीला हा आजार असल्याचे मागील आठवड्यात त्यांना समजले. तिच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्वीचा आजार आनुवंशिक आहे. आरती व सूरज यांच्या कुटुंबीयांमध्ये हा आजार नव्हता. मात्र, त्यांच्या आधीच्या पिढीतून यांच्यामार्फत तो वाहक बनला असावा. त्यामुळे अन्वीला आजार झाल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा कयास आहे. एसएमए हा आजार १० हजार मुलांमागे एकाला होऊ शकते. हा आजार झाल्यापासून अन्वीच्या हाता-पायात ताकद नाही. या आजारात शरीराला प्रोटीन्स मिळत नाहीत. हात-पाय निपचित पडत जाऊन तो छातीपर्यंत पसरतो. त्यानंतर रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. या आजारावर झोलजेन्समा नावाचे औषध असून ते नोवर्टिस कंपनी तयार करते. हे औषध कंपनीकडून मागवावे लागते. त्याचा खर्च जवळपास १८ कोटी रुपये इतका आहे. या औषधाद्वारे जनुके बदलता येऊ शकतात.  अन्वीचे आई-वडील दोघेही खासगी कंपनीत कामाला असून, दोघांचा पगार हा महिन्याला ७० हजारांच्या आसपास आहे. उपचारासाठी १८ कोटी जमल्यावर झोलजेन्समा औषध मागवता येणार आहे. त्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. मदत मिळाल्यावर अन्वीवर उपचार करणे शक्य होईल. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलू शकते.

सोशल मीडियाद्वारे मदतीचे आवाहन -अन्वीची आई आरती ही लॉकडाऊनमध्ये योगा क्लास करत होती. डोंबिवली योगा शक्ती केंद्राचे सुहाड बडंबे यांच्या माध्यमातून झूम ॲपद्वारे योगाचे धडे घेत होत्या. सुहास यांना ही माहिती मिळताच त्यांनी अन्वीच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन सोशल मीडियाद्वारेही केले आहे. 

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलkalyanकल्याण