शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

"कोरोनात मेलो असतो तर बरे झाले असते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 01:55 IST

कल्याणमधील रिक्षाचालकाची व्यथा; कमाई घटल्याने घरखर्च चालविणे कठीण

कल्याण : ‘दोन वेळच्या जेवणासाठी किराणा भरणे, घरखर्च चालविणे कठीण होऊन बसले आहे. रिक्षाव्यवसाय निम्म्यावर आला आहे. त्यामुळे कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा. पैसे उसने घेऊन किती दिवस चालणार,’ अशी व्यथा कल्याणमधील रिक्षाचालक पुरुषोत्तम सोनवणे यांनी मांडली आहे.सोनवणे यांनी सांगितलेली व्यथा ही त्यांच्या एकट्याचीच नाही. तर अन्य रिक्षाचालकही हीच गोष्ट सांगत आहेत. कोरोना काळात मार्च ते जूनदरम्यान रिक्षा बंद असल्याने रिक्षाचालक घरीच होते. अनलॉकमध्ये रिक्षा सुरू झाल्या असल्या तरी त्यासाठी नियमावली होती. दोन प्रवासी घेऊन जाताना भाड्यासाठी कसरत करावी लागत होती. मुलांचे शिक्षण कोरोना काळात ऑनलाइनद्वारे होते. आता शाळा सुरू झाल्याने मुलांची फी भरण्यासाठी शाळांकडून विचारणा केली जात आहे. त्यातच विजेचे वाढीव बिल आले आहे. ते कुठून भरायचे, असा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.अनलॉकमध्ये रिक्षा चालविणे जिकिरीचे होते. त्यानंतर आता लोकलसेवा सुरू झाली आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेने वेळ ठरवून दिली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना अपेक्षित प्रवासी भाडी मिळत नाहीत. त्यामुळे एक तास रिक्षाच्या रांगेत उभे राहून एक भाडे मिळते. रात्री ९ नंतर तर भाडे मिळत नाही. दुपारी घरी जेवायला जावे, तर आर्थिक विवंचनेमुळे भाकरीचा घास गळ्याच्या खाली उतरत नाही. पैसा कुठून आणायचा. कोरोनात मेलो असतो तर बरे झाले असते. ही विवंचना संपली असती, असे सांगताना सोनवणे यांच्या  डोळ्यात पाणी आले.‘मदतीचा हात द्या’रिक्षाचालकांना दिलासा देण्यासाठी लोकल सेवेचे वेळापत्रक बदलले जावे. तसेच रिक्षाचालकांना सरकारने मदतीचा हात दिला पाहिजे. रिक्षाचालकांच्या कल्याणकारी योजनेसाठी जो निधी ठेवला होता, तो खर्च केला पाहिजे, अशी मागणी रिक्षाचालकांकडून केली जात आहे.