शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांची रिक्षास्टॅण्डमध्ये घुसखोरी; रिक्षावाल्यांचे केडीएमसी कार्यालयासमोेर ठिय्या आंदोलन

By प्रशांत माने | Updated: November 8, 2023 15:43 IST

दरम्यान फेरीवाल्यांवर कारवाईचे आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: उच्च न्यायालयाने व्यवसायास मनाई केलेल्या रेल्वे स्थानकापासूनच्या १५० मीटर परिक्षेत्रात फेरीवाल्यांचे बिनदिक्कतपणे होत असलेल्या अतिक्रमणाचा सिलसिला सुरू असताना आज त्यांनी रिक्षास्टॅण्डमध्येही घुसखोरी केल्याने रिक्षाचालक आक्रमक झाले. थेट त्यांनी केडीएमसीचे विभागीय कार्यालयासमोर ठिय्या मांडत आंदोलन छेडले. दरम्यान फेरीवाल्यांवर कारवाईचे आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

सध्या फेरीवाला अतिक्रमणाच्या विरोधात डोंबिवलीत केडीएमसीची मोठी कारवाई सुरू आहे. कल्याणमधील अतिक्रमण विरोधी पथके डोंबिवलीत आणून त्यांच्याकडून ही कारवाई सुरू आहे. दरम्यान या कारवाईमुळे ऐन दिवाळीत उपासमारीची वेळ आल्याने फेरीवाले देखील आक्रमक झाले आहेत. काल प्रशासनाच्या कारवाईला जोरदार विरोध झाला होता. आज देखील हे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान आज सकाळपासूनच फेरीवाल्यांनी पुन्हा मनाई केलेल्या १५० मीटर परिक्षेत्रात अतिक्रमण केले होते. रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षास्टॅण्डच्या ठिकाणी देखील फेरीवाल्यांनी बस्तान ठोकल्याने रिक्षाचालक आक्रमक झाले आणि त्यांनी थेट केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालय गाठले आणि फेरीवाल्यांना परवानगी दिली कोणी असा सवाल तेथील कर्मचा-यांना करण्यात आला. मनपा प्रशासनाच्या विरोधात यावेळी घोषणाबाजीही केली गेली. दरम्यान फेरीवाल्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन मिळाल्यावर रिक्षाचालकांनी आंदोलन मागे घेतले. कारवाईच्या मागणीसाठी त्यांनी विभागीय कार्यालयातून निघत वाहतूक पोलिसांचे कार्यालय देखील गाठले होते.

त्यांचे स्टॅण्ड अधिकृत आहेत का?

फेरीवाल्यांनी पाटकर रिक्षास्टॅण्ड, चिमणीगल्ली, नेहरू रोड, भाजीमार्केट परिसरात अतिक्रमण केले होते. याठिकाणी असलेल्या रिक्षास्टॅण्डमध्ये फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याचा आरोप रिक्षाचालकांचा आहे. परंतू त्यांचे स्टॅण्ड अधिकृत आहेत का? असा सवाल फेरीवाल्यांनी केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका