शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते बाधितांच्या घरासाठी जागरुक नागरीक फाऊंडेशनचे केडीएमसीसमोर बेमुदत उपोषण

By मुरलीधर भवार | Updated: February 12, 2024 14:06 IST

फाऊंडेशनचे प्रमुख घाणेकर यांनी सांगितले की, महापालिका मुख्यालय ते बाजारपेठ रस्त्याचे २००० साली रुंदीकरण करण्यात आले.

कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिका ते बाजारपेठ रस्त्यात २४ वर्षापूर्वी बाधित झालेल्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र त्या आदेशाची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. या मागणीसाठी जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने सात वेळा उपोषण  आणि धरणे आंदोलन करण्यात आले. तरी देखील महापालिका प्रशासनाकडून त्याची पूर्तता केली जात नाही. जोपर्यंत बाधिताचे पुनर्वसन केल जात नाही. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा फाऊंडेशनच प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे. आजपासून महापालिका मुख्यालयासमोर फाऊंडेशने बेमुदत उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणास म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास यांनी पाठिंबा दिला आहे.

फाऊंडेशनचे प्रमुख घाणेकर यांनी सांगितले की, महापालिका मुख्यालय ते बाजारपेठ रस्त्याचे २००० साली रुंदीकरण करण्यात आले. या रस्ता रुंदीकरणात १५४ जण बाधित झाले हाेते. बाधितांची घरे आणि दुकाने रस्ता रुंदीकरणात तोडण्यात आली होती. त्यांच्या पुनर्वसनाची मागणी करण्यात आली होती. तत्कालीन आयुक्तांनी त्या मागणीची दखल घेतली नाही. महापालिकेच्या कारवाईच्या विरोधात रस्ते बाधितांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यावर महापालिकेस आदेस दिले होते की, बाधितांना घरे दिली जावीत. ती कोणत्या ठिकाणी द्यावीत. त्याचे किती वेळेत पुनर्वसन करावे  हे देखील सांगितले होते. महापालिकेने २४ वर्षे उलटून गेली तरी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. तसेच बाधितांना घरे दिली नाहीत. आज महापालिका मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापालिकेच्या रस्ते प्रकल्पात बाधितांना बीएसयूपी योजनेतील घरे वाटप करण्यात येणार आहेत. महापालिकेने रस्ते प्रकल्पातील बाधितांना घरे देण्याच्या कार्यक्रमास फाऊंडेशनचा विरोध नाही. मात्र २४ वर्षापूर्वी रस्ते प्रकल्पात बाधित झालेल्याना पुनर्वसनापासून वंचित ठेवणे. त्याना घरे न देणे, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणे या बाबी गंभीर आहे. महापालिकेची कृती बाजारपेठ रस्ते बाधितांवर अन्याय करणारी आणि दुजाभाव दर्शविणारी असल्याचा आरोप घाणेकर यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या उपोषणाला भेट दिली तर त्यांना ही बाब सांगूच पण महापालिका प्रशासनाने आमच्या उपोषणाची दखल घेऊन प्रश्न मार्गी लावला नाही तर उपोषण मागे घेतले जाणार नाही असे घाणेकर यांनी सांगितले.माहिती अधिकार कार्यकर्ते विनोद तिवारी यांनीही महापालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. बेकायदा बांधकाम प्रकरणात आणि बेकायदा होर्डिंग प्रकरणात दाखल याचिका करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिकेस दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्या प्रकरणी महापालिका अधिकाऱ््यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत.  या मागणीकरीता तिवारी यांनी उपोषण सुरु केले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका