शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
4
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
5
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
6
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
7
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
8
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
9
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
10
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
11
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
12
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
13
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
14
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
15
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
16
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
17
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
18
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
19
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
20
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
Daily Top 2Weekly Top 5

१४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करा, सर्व पक्षीय विकास समितीच्या मागणीला मनसेचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 16:41 IST

MNS News : १४ गावांचा विकास झालेला नसल्याने पाच ग्रामपंचायती अंतर्गत येणा-या १४ गावांनी ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकला आहे.

कल्याण-१४ गावे यापूर्वी नवी मुंबई महापालिकेत होती. ही गावे पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी सर्व पक्षीय विकास समितीच्या वतीने काल पुन्हा एकदा करण्यात आली आहे. या मागणीस मनसेने जाहिर पाठिंबा दिला असून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ही मागणी सरकार दरबारी मांडली जाईल असे आश्वासन १४ गावातील ग्रामस्थांना दिले आहे.१४ गावांचा विकास झालेला नसल्याने पाच ग्रामपंचायती अंतर्गत येणा:या १४ गावांनी ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकला आहे. सर्व पक्षीय विकास समितीने हा बहिष्काराचा निर्णय घेतला होता. बहिष्कार यशस्वी झाला आहे. त्या पाश्र्वमीवर दहिसर येथे काशी विश्वेश्वर मंदिरात १४ गावांची एक बैठक पार पडली. या बैठकीस आमदार पाटील हे उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व पक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील हे उपस्थित होते. यावेळी १४ गावातील खासदार, आमदार आमचे असताना गावे महापालिकेत समाविष्ट केली जात नाही. यावर ग्रामस्थांनी जोर दिला. या गावांच्या विकासाकरीता ही गावे नवी मुंबईत समाविष्ट केली जावीत. ही गावे महापालिकेत समाविष्ट न करण्यामागचे सबळ कारण कोणी तरी द्यावे असा सवालही यावेळी आमदार पाटील यांनी उपस्थित केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. त्यामुळे त्यांना हा निर्णय घेणे सहज शक्य आहे. २७ गावे समाविष्ट करण्याचा ठराव नसताना ही गावे कल्याण डोंबिनलीत समाविष्ट केली. मात्र १४ गावच्या ग्रामपंचायतीनी ठराव करुन त्यांना नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. नवी मुंबई महापालिकेचाही अशासकीय ठराव आहे. मग ही गावे महापालिकेत समाविष्ट केला केली जात नाही  हा गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी राज्य सरकार दरबारी लावून धरणार असून त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली जाणार असल्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी ग्रामस्थांना दिले आहे.सर्व पक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी सांगितले की, ग्रामपंचायत निवडणूकीवर तीन वेळा बहिष्कार टाकला आहे. बहिष्कार यशस्वी झाला आहे. त्यामुळे १४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीNavi Mumbaiनवी मुंबईMNSमनसे