शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात शासनाची लाडली बहिण उत्पन्न दाखल्यासाठी रांगेत लाडली बहीण 

By सदानंद नाईक | Updated: July 2, 2024 18:04 IST

योजनेचे स्वागत, दाखल्यासाठी बहिणीची वणवण थांबेना

उल्हासनगर : शासनाच्या लाडली बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना रहिवासी व उत्पन्नाच्या दाखल्याची गरज आहे. त्यासाठी तहसील तलाठी कार्यालयाबाहेर लाडली बहिणीला रांगा लावावे लागत असून सेतू केंद्र बंद असल्याने, आपले सरकार सेवा केंद्रा समोर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व उत्पन्न तसेच रहिवासी दाखल्यासाठी जादा पैसे मोजावे लागत असल्याची प्रतिक्रिया लाडल्या बहिणी देत आहेत. 

शासनाने लाडली बहीण योजना लागू केली असून या योजनेचे महिलेकडून जोरदार स्वागत झाले. मात्र यायोजनेचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहिणींना अडथळ्यांची शर्यत पूर्ण करावी लागत आहे. या योजनेसाठी २१ ते ६० वयोगटातील महिला पात्र असणार असून शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी महिलेचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार ५०० रुपये पेक्षा जास्त नसावे, कुटुंबातील सदस्य करदाता नसावा, सरकारी अथवा कुटुंबातील कंत्राटी कामगार नसावा, इतर योजनेचा लाभ घेतला नसावा, राज्याचा रहिवासी असावा, चारचाकी वाहन नसावे तसेच संयुक्तपणे ५ एकर शेती नसावी. आदी निकष लाडली बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी लावण्यात आले. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेकडो महिलांनी तहसील कार्यालय परिसरात एकच गर्दी करून उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तलाठी यांचा अहवाल घेण्यासाठी कार्यालया बाहेर रांगा लावल्या आहेत. 

शासनाच्या लाडली बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला ज्यांनी किमान २१ वर्षे पूर्ण केले असावे. तसेच वयाच्या ६० वर्षा पर्यंत लाभ मिळणार आहेत. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांकडे बँक खाते असणे आवश्यक केले आहे.

 तहसील कार्यालयातील सेतू केंद्र बंद तहसील कार्यालयातील सेतु केंद्रातून विविध दाखले अत्यल्प किमतीत दिले जातात. मात्र गेल्या दिड वर्षांपासून सेतू केंद्र बंद असून विविध दाखल्यासाठी नागरिकांना आपले सरकार सेवा केंद्राची मदत घ्यावी लागत आहे. याप्रकाराने जादा किमती देऊन दाखले घ्यावे लागत असल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली.

 दाखल्यासाठी ऑनलाइन अर्ज. तहसिलदार कल्याणी कदम नागरिकांना विविध दाखल्यासाठी ऑनलाइन अर्ज करावे लागते, मग अर्ज सेतुतून करा की,आपले सरकार सेवा केंद्रातून. सेतुकेंद्रात गैरप्रकार झाल्याने, बंद करण्यात आला होता. मात्र सेतू केंद्राचा ठेका दिल्याने, लवकरच सेतुकेंद्र सुरू होणार आहे.