शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी किती वेळा रास्ता रोको करायचा; पाणी कधी मिळणार संतप्त महिलाचा सवाल

By मुरलीधर भवार | Updated: September 30, 2022 15:20 IST

ग्रामीण भागासह टाटा नाका येथील देशमुख परिसरातील नागरीकांनाही पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो.

कल्याण- शहराच्या पूर्व भागातील खडेगोळवली आणि माणोरा गाव परिसरात पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांकडून प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविला जात नाही. पाणी कधी मिळणार असा संतप्त सवाल उपस्थित करीत महिला वर्गाने आज आय प्रभाग कार्यालयाच्या समोरच ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन केले. आत्ता तरी प्रशासनाने आमची दखल घेऊन पाणी प्रश्न सोडवावा अशी आपेक्षा आंदोलन करणाऱ्या महिलांनी व्यक्त केली आहे.

यंदाचा पाऊस चांगला पडल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेस पाण्याचा प्रश्न उद्धवला नाही पाहिजे. मात्र कल्याण ग्रामीण भागातील दावडी, भोपर भागात पाण्याचा प्रश्न तीव्र आहे. चांगला पाऊस होऊन धरणो भरुन देखील विविध भागात पाण्याची टंचाई जाणवते. त्याचबरोबर दोनच दिवसापूर्वी दावडी परिसरातील नागरीकांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन पाणी प्रश्न त्यांच्याकडे मांडला होता. त्यावर मंत्री चव्हाण यांनी संताप व्यक्त करीत प्रशासनाचा कारभारच ढिसाळ असल्याचे म्हटले होते. लवकर बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.

ग्रामीण भागासह टाटा नाका येथील देशमुख परिसरातील नागरीकांनाही पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो. त्यांचाही प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. ही परिस्थिती असताना आत्ता खडेगोळवली माणोरा गाव परिसरातील नागरीकांना पाणी मिळत नसल्याने संतप्त महिलांनी आय प्रभागासमोर ठिय्या देत महापालिकेच्या विरोधात आंदोलन केले आहे. काही वेळेसाठी महिलांनी रास्ता रोको केला होता.टंचाई ग्रस्त भागाला महापालिकेकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र ज्या मालमत्ता धारकाकडून कर थकविला आहे. तसेच ज्या मालमत्ता कर बुडव्या आहे. बेकायदा चाळी, बांधकामे आहे. त्यांना टँकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कारण या टँकरवर दिवसाला एक लाख रुपयांचा खर्च होत होता. हे टँकर बंद केले आहे. आंदोलन करणा:या महिलांनी सांगितले की, आम्ही मालमत्ता कर भरतो. तरी देखील आम्हाला महापालिका पाणी पुरवठा करती नाही. आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचा फटका कर भरणाऱ्या नागरिकांनीही बसला असल्याच्या मुद्याकडे महिलांनी लक्ष वेधले.