- सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-५, सेकशन ३६ येथील एक जुने बांधकाम पाडून नवीन बांधकाम बांधण्याचा ठेका जमीन मालक जितेंद्र सावलानी यांनी तेजस पाटील याला दिला होता. २४ मार्च रोजी जुने बांधकाम तोडताना भिंत अंगावर पडून मजूर कामगार असलेल्या ज्ञानेश्वर सुपडा सोमस याचा मृत्यू झाला. चौकशीअंती याप्रकरणी पाटील व सावलानी यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगरातील एका अवैध बांधकामांच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात महापालिका आणि पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. असे अवैध बांधकामे नियमित केल्यास राज्यात अराजकता माजेल. असे निरीक्षण न्यायमूर्ती अजय गडकरी व न्या. कमल खाटा यांच्या खंडपीठाने यासंबंधीची नोंदविले. अवैध बांधकामांवर कारवाई करण्यास महापालिका आणि पोलीस का अपयशी ठरत आहेत? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केल्याने, शहरातील अवैध बांधकामचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. शहरांत राजकीय नेते व महापालिका अधिकारी यांच्या आशीर्वादाने सर्रासपणे अवैध बांधकामे सुरु असल्याची टीका होत आहे.
दरम्यान कॅम्प नं-५ येथील जुने बांधकाम पडून नवीन बांधकामचा ठेका जमीन मालक जितेंद्र सावलानी यांनी तेजस लक्ष्मण पाटील याला दिला होता. जुने बांधकाम पाडताना भिंत अंगावर पडून एका कामगारांचा मृत्यू झाल्याचा ठपका पोलिसांनी ठेवून सावलानी व पाटील यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकाराने पुन्हा एकदा अवैध बांधकामचा प्रश्न ऐरणीवर येऊन उच्च न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण महापालिका विचारता घेते की नाही?. असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नदी किनारी लॉन्स शांतीनगर येथील वालधुनी नदी किनारी शासन भुखंडावर महापालिकेच्या नाकावर टिचून अवैधपणे लॉन्स उभा राहिला आहे. यावर एका वर्षांपूर्वी महापालिकेने कारवाई केली होती.
महापालिका शाळेच्या भूखंडावर सनद कॅम्प नं-५ येथील महापालिका शाळेच्या मैदानावर सनद काढण्याचा प्रकार उघड झाला. महापालिकेने याबाबत पाठपुरावा केला. मात्र अद्यापही निर्णय आला नाही.
वालधुनी नदी किनारी अवैध अतिक्रमण शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदी किनारील मोकळ्या जागेवर प्रांत कार्यालयातून सनद दिल्या जात आहे. भविष्यात याठिकाणी बांधकामे झाल्यास पुराचा सर्वाधिक फटका शहराला बसणार असल्याचे बोलले जात आहे.