शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

"पक्षाने मला सांगितले तर मी वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवेन"

By मुरलीधर भवार | Updated: February 28, 2024 15:03 IST

शिवसेना नेत्या सुषमाअंधारे यांचे वक्तव्य, कल्याण वाढती गुन्हेगारी ,वाढती ठेकेदारी यामुळे नागरिकांसह पोलीस यंत्रणा सुद्धा दहशतीखाली आहे

कल्याण-शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदार संघातून सुषमा अंधारे यांना उमेदवारी दिली जाणा अशी चर्चा आहे. याविषयी शिवसेना नेत्या सुषणा अंधारे यांनी सांगितेल की, माझे नाव चर्चेत आहे. पण मला त्याबाबत अधिकृत निरोप नाही. मला फक्त काम करायचे आहे. पक्षाने मला सांगितले तर वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढविणार. शिवसेना नेत्या अंधारे यांची मुक्त संवाद यात्रा सुरु आहे. या निमित्त त्या कल्याणला आल्या होत्या. त्यांनी प्रथम विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

त्यानंतर त्यांनी कोळसेवाडी शिवसेना शाखेतील पदाधिकाऱ्यांची भेटीगाठी घेतल्या. यावेळी अंधारे यांनी शाखेत पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्यांनी आव्हान पेलण्यास तयार आहे. पक्षाकडून होणार आला पाहिजे असेच सूचक विधान केले.अंधारे म्हणाल्या की, श्रीकांत शिंदे म्हणजे फार मोठा अडचणीचा डोंगर असे वाटत नाही. आम्हाला त्यांच्याशी समोर सामोरे जाताना फार मोठा आव्हान आहे असे वाटत नाही. कल्याणमध्ये शिंदे गटाचा शहर प्रमुखावर भाजप आमदार अंधारात नाही तर भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात. हे दोघेही सरकार पक्षातले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वितुष्ट हे गॅंगवारचे स्वरूप घेत असल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे.

सरकारने मनोज जरांगे पाटील प्रकरणी एसआयटी चौकशी लावण्याचे आदेश दिलेत याबाबत बोलताना सरकारने ही चौकशी करायला हरकत नाही. मात्र त्यासोबतच मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण, एसटी आरक्षणाच्या लढ्यात जे तीन-चारशे लोक मेलेत त्यांची एसआयटी चौकशी सरकार लावणार आहे का ? सरकारला जर एसआयटी चौकशी लावण्याचे हौस असेल, तर भीमा कोरेगावच्या एसआयटी चौकशीचे काय झाले ? यावर सरकारने उत्तर दिले पाहिजे. आत्तापर्यंत अफरातफरी गोंगाट आणि गोंधळ झाल्यामुळे अनेक लोकांचे जीव गेले. त्याचे एसआयटी चौकशीचा काय समृद्धी महामार्गावर भीषण अपघातामध्ये जे २८ ते ३० लोक गेले. एकाच वेळेला हे सगळे अपघात होतात याचे एखादे चौकशी सरकारी लावणार आहे का ? असा सवाल केला.

एसआयटी चौकशी लावण्याचा जे काही नाटक सरकारकडून सुरू आहे ,फडणवीस साहेबांनी कही पे निगाहे, कही पे निशाणा करू नये फडणवीस साहेबांचा निशाणा जर थेट शिंदे साहेबांवर असेल तर ते थेट सभागृहात बोलावे. आडून-अडून राजेश टोपे ,पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे असे नावे न घेता थेट निशाणा साधावा. थेट बोलावे कारण जर तुमचे काही आक्षेप असतील तर मला असे वाटते की त्या सगळ्या घडामोडींमध्ये मंगेश चिवटे सारख्या माणसाचा वावर पण फार महत्त्वाचा होता त्यामुळे फडणवीस साहेबांनी थेट निशाणे साधावेत हे आमचे अपेक्षा असल्याचे अंधारे यांनी सांगितले

कल्याण वाढती गुन्हेगारी ,वाढती ठेकेदारी यामुळे नागरिकांसह पोलीस यंत्रणा सुद्धा दहशतीखाली आहे. दस्तूर खुद्द भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे साहेबांच्या शहर प्रमुखाला गोळ्या घालाव्यात. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांमधला अंतर्गत गॅंगवार किती टोकाला पोहोचला हे दिसून येते. या परिस्थितीत निश्चितपणे वाटते येणारी निवडणूक श्रीकांत शिंदे यांच्यासाठी इतकी सोपी असणार नाही. जितकी सोपी त्यांना मुख्यमंत्री पुत्र म्हणून वाटत आहे . मुख्यमंत्री स्वतःचे प्रोजेक्शन शेतकरी पुत्र म्हणून करत असले तरी श्रीकांत शिंदे यांचा प्रोजेक्शन शेतकरी पुत्र म्हणून करू शकणार नाहीत. श्रीकांत शिंदे हे अत्यंत गर्भ श्रीमंत आणि पक्ष फोडण्यात तरबेज असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत अशी टीका अंधारे यांनी केली.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारे