शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

स्टेशन परिसरात फेरीवाले बसले तर अधिकाऱ्यांना ठोकून काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 07:57 IST

मनसे आमदार राजू पाटील यांचा केडीएमसीला इशारा; पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

कल्याण : कल्याण स्टेशन परिसरात फेरीवाले बसले तर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ठोकून काढू, असा सज्जड इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवाॅकवर मराठी तरुणाला तुम्ही मराठी लोक असेच असता, असे म्हणून परप्रांतीय फेरीवाल्यांनी मारहाण केली. या तरुणाच्या मदतीला मनसे कार्यकर्ते धावले. त्यांनी फेरीवाल्यांना चांगलाच चोप दिला. या प्रकरणात महात्मा फुले पोलिस ठाण्यात मराठी तरुणासह मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, तर फेरीवाल्यांच्या विरोधात केवळ एनसी दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा जाब विचारण्यासाठी बुधवारी मनसे आमदार पाटील यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांची भेट घेतली. पोलिसांनी असा कसा गुन्हा दाखल केला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याप्रसंगी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, चेतना रामचंद्रन, योगेश गव्हाने, विनोद केणे आदी उपस्थित होते.

प्रशासनाला कारवाईचे आदेश त्वरित देण्याचे आश्वासन

फेरीवाला हा प्रश्न महापालिकेशी संबंधित आहे. तसेच रेल्वेचा काही भाग हा रेल्वे पोलिसांच्या हद्दीत असल्याने या दोन्ही प्रशासनाला महात्मा फुले पोलिस ठाण्याकडून आजच  पत्र दिले जाईल. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेत कारवाई करण्यास सांगितले जाईल, असे आश्वासन वरिष्ठ पोलिस निरीक्षक होनमाने यांनी आमदार पाटील यांना दिले आहे.

‘केडीएमसीला भीक लागली असेल, तर भीक मागून पैसे देऊ’

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात आणि स्टेशन परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्यांचा काही उपयोग होतो की नाही, असा सवालही आमदार राजू पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. केडीएमसीला भीक लागली असेल तर आम्ही चार दिवस स्टेशनच्या बाहेर बसून भीक मागून त्यातून आलेले पैसे केडीएमसीला देऊ, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.