शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण डोंबिवली उल्हासनगरात किती पाकिस्तानी राहतात ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 22:06 IST

भारतामध्ये जे नागरिक शॉर्ट टर्म  व्हिसाच्या माध्यमातून राहत आहेत त्यांना 48 तासाच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे...

मयुरी चव्हाण काकडे -

  काश्मीर येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात सत्तावीस भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. यातील सहा पर्यटक हे महाराष्ट्रातील होते. या घटनेनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून  पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा संतप्त नागरिकांनी दिल्या. त्यानंतर केंद्र शासनाने सुद्धा तातडीने पावलं उचलत अनेक निर्णय घेतले. त्यापैकी भारतामध्ये जे नागरिक शॉर्ट टर्म  व्हिसाच्या माध्यमातून राहत आहेत त्यांना 48 तासाच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नागरिकांची शोधाशोध आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलिसांच्या माध्यमातूनही सुरू करण्यात आली ... कल्याण डोंबिवली शहरात म्हणजेच झोन ३ मध्ये सध्या शॉर्ट टर्म  व्हिसाच्या माध्यमातून शून्य नागरिक वास्तव्यास आहेत तर उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ विठ्ठलवाडी या परिसरात म्हणजेच परिमंडळ चार मध्ये एकूण 17 नागरिक वास्तव्यास आहेत अशी माहिती झोन 4 चे डीसीपी सचिन गोरे यांनी दिली. लाँग टर्म व्हिसा बाबत अजून काही आदेश आले नाहीत. आदेश आल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल असेही गोरे यांनी सांगितले. विशेष बाब  म्हणजे हे सर्व नागरिक सिंधी समाजाचे आहेत.फाळणी नंतर तिथून निर्वासित होऊन आलेले सिंध प्रांतातील हिंदू, म्हणजेच आपण ज्यांना सिंधी म्हणतो ते  लोक. काही सिंधी समाजाचे बांधव विशेषतः उल्हासनगर आणि इतर परिसरामध्ये वास्तव्यास राहिले. विस्थापित होऊन आल्यामुळे एकाच कुटुंबातल्या लोकांची फाटाफूट झली होती. मात्र त्यांचे काही  नातलग हे पाकिस्तानात राहतात.

त्यानंतर पाकिस्तानातून आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी भारतात येण्याचा सिलसिला सुरू झाला. या नातेवाईकांना भेटण्यासाठी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून  सिंधी समाजाचे लोक भारतामध्ये आले होते. या सर्वांना आता भारत देश लवकरात लवकर सोडावा लागणार आहे. झोन 4 मधील बहुतांश नागरिक हे रविवारी म्हणजेच  27 एप्रिल रोजी भारत सोडणार आहेत तर उर्वरित नागरिक हे  28 तारखेला पाकिस्तानच्या दिशेने रवाना होणार आहेत. जोपर्यंत लाँग टर्म  व्हिसाबाबत केंद्र शासनाकडून  काही निर्णय होत नाही तोपर्यंत अशा पाकिस्तानी नागरिकांना भारतात राहण्याची मुभा आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाkalyanकल्याणulhasnagarउल्हासनगरdombivaliडोंबिवली