शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावातील बेकायदा घर नोंदणी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा; मनसे आमदाराची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 16:02 IST

२७ गावे ही महापालिकेत नव्हती. तेव्हा त्याठिकाणी जिल्हा परिषद आणि एमएमआरडीए नियोजन प्राधिकरण होते

कल्याण- कल्याण ग्रामीणमधील २७ गावातील घर नोंदणी बंद असताना देखील बेकायदा घर नोंदणी केली जात आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. या नोंदणी घोटळ्य़ातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची नावे उघड व्हावीत याकडे आमदारांनी लक्ष वेधले आहे.

कल्याणच्या २७ गावात बेकायदा बांधकामे केली जातात. या बांधकामांमध्ये सामान्य नागरीक घर घेतात. त्यांची फसवणूक केली जाते. या गावातील बेकायदा घराच्या विक्रीतून सामान्यांची फसवणूक होऊ नये यासाठी या परिसरातील घरांची नोंदणी बंद आहे. मात्र काही राजकीय मंडळी, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे मिळून बेकायदेशीरपणो घरांची नोंदणी करीत आहे. त्यासाठी टोकनचे वाटप केले जाते. एका टोकनच्या मागे नोंदणी करण्यासाठी ७० हजार ते 2 लाखापर्यंत पैसे सामान्यांकडून उकळले जात आहेत असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते नरसिंग गायसमुद्रे यांनी केला होता. यासंदर्भात आमदार पाटील यांनी सांगितले की, २७ गावे ही कल्याण ग्रामीण मतदार संघात येतात. कल्याण ग्रामीण मतदार संघाचा मी लोकप्रतिनिधी आहे. आरोप करणाऱ्याने राजकीय लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यावर आरोप केला आहे. त्यामुळे तो लोकप्रतिनिधी कोण. त्याचा बोलविता धनी कोण याची हे स्पष्ट व्हावे यासाठी आमदार पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

२७ गावे ही महापालिकेत नव्हती. तेव्हा त्याठिकाणी जिल्हा परिषद आणि एमएमआरडीए नियोजन प्राधिकरण होते. या गावातील बांधकाम प्लान मंजूर होत होते. त्यामुळे लोकांनी स्वत:च्या जागेवर बांधकाम केले आहे. ते बांधकाम बेकायदेशीर आहे हे मी मानत नाही. एखाद्या व्यक्तीने बांधकामाची परवानगी मागून नियमानुसार ६० दिवसात परवानगी दिली गेली नाही. तर डीम सॅक्शन म्हणून बांधकाम करता येते. त्यानुसार काही मंडळींनी कामे केली आहेत. या गोष्टीचा काही मंडळी गैरफायदा घेऊन टोकन पद्धतीने पैसा उकळून भ्रष्टाचार करीत असतील त्यात लोकप्रतिनिधी सामील असल्याचा गंभीर आरोप करीत असलीत तर लोकप्रतिनिधी कोण हे उघड झाले पाहिजे यासाठी उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :MNSमनसेkalyanकल्याण