शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 16:23 IST

अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असतानाच मुंबईसह अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली.

अनिकेत घमंडी/ सचिन सागरे/ प्रज्ञा म्हात्रे 

अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असतानाच सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कल्याणडोंबिवली शहरांना पावसाने झोडपले. आधी सोसाट्याचा वारा, धूळ आणि काळोख झाला, त्यामुळे जोरदार पाऊस येणार असल्याने पादचारी, दुकानदार, भाजी बाजार यांमध्ये धावपळ झाली, आणि तेवढ्यात पाऊस आला. पावणे चार पर्यंत वारा आणि पावसाच्या सरी पडल्या, त्यानंतर मात्र वातावरण शांत झाले, पावसाची जोरदार सर ओसरली असली तरी पाऊस मात्र सुरूच होता. 

 

पूर्वेला सोमवार असल्याने शहरातील फडके पथ, मानपाडा रस्ता येथील बाजार पेठेत दुकाने बंद असल्याने आणि दुपारची वेळ असल्याने फारशी गर्दी नव्हती, परंतु पश्चिमेला बाजारपेठ असल्याने तेथे मात्र दुकानदार, भाजी विक्रेते आदींची।धावपळ।झाली. काही प्रमाणात मालाचे नुकसान झाले. रेल्वे स्थानक परिसरात वीज पुरवठा खंडीत झाला होता, त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली होती. आधीच उकाडा त्यात वीज नसल्याने पंचाईत झाली. 

मुंबईतही पावसाची हजेरी 

सध्याकाळी ४ च्या सुमारास मुंबईतही पावसानं जोरदार हजेरी लावली. सुरुवातीला वादळी वाराही सुटला होता. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. ठाणे शहरात दुपारी तीन वाजल्यापासून वादळी वारे सुटले होते आणि पावणेचार वाजता पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यांसह हा पाऊस सुरू असून काही भागांत वीज गेली आहे.दरम्यान, हवामान खात्यानं काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला होता. बदलापूरमध्येही जोरदार वाऱ्यासह पाऊसाची सुरूवात झाली असून वाऱ्याचा वेग १०७ किमी इतका असल्याचं म्हटलं जातंय. 

कल्याणमध्येही पाऊस 

कल्याण : कल्याण शहरात दुपारी साडे तीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या या पावसामुळे पादचाऱ्यांसह फेरीवाल्यांची धांदल उडाली. काहींनी रेनकोट, छत्री घेऊन तर काहींनी भिजून या पावसाचा आनंद घेतला. 

टॅग्स :Mumbaiमुंबईkalyanकल्याणdombivaliडोंबिवली