शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

लोकांसाठी आरोग्य सुविधा, यंत्रणेवर भर; KDMC चा १,७०० कोटींचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:28 IST

आयुक्तांनी दिली मंजुरी, मनपाची १५ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. ‘आपला दवाखाना’अंतर्गत २५ दवाखाने उभारण्याचा मानस आहे

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोना रुग्ण वाढत असल्याने मनपा प्रशासनाने पुन्हा आरोग्य सोयी-सुविधा आणि यंत्रणेवर भर देणारा अर्थसंकल्प तयार केला आहे. यंदाच्या वर्षी जमेचे १,७०० कोटी रुपये, तर १,६९९ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. हा अर्थसंकल्प अत्यंत वास्तववादी असल्याचे मत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मांडत त्यास त्यांनी बुधवारी मंजुरी दिली आहे. चालूवर्षीच्या तुलनेत ६७४ कोटींनी कमी असलेला अर्थसंकल्प मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले. 

मनपाच्या सदस्य मंडळाची मुदत ११ नोव्हेंबर २०२० ला संपली आहे. त्यामुळे अर्थसंकल्प स्थायी समिती व त्यानंतर महासभेला सादर केला जाणार नाही. मनपाचे प्रशासक या नात्याने आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर करत त्याला मंजुरीही दिली आहे. आयुक्तांनी सांगितले की, मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तेव्हा मनपाकडे ६५ बेड होते, तर आज पाच हजार ८६७ बेड उपलब्ध आहेत. कोरोनाचे आतापर्यंत ६७ हजार १९३ रुग्ण आढळून आले. त्यापैकी ३० हजार २५६ रुग्णांवर मोफत उपचार केले. आतापर्यंत ६२ हजार ९०८ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रोखण्यासाठी मनपाने आतापर्यंत १३५ कोटींचा खर्च केला आहे. यंदाच्या वर्षात त्याकरिता अर्थसंकल्पात ९७ कोटींची तरतूद केली आहे. 

ते पुढे म्हणाले, मनपाची १५ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. ‘आपला दवाखाना’अंतर्गत २५ दवाखाने उभारण्याचा मानस आहे. टिटवाळा आणि वसंत व्हॅली येथे नवी रुग्णालये उभारली आहेत. कल्याण व डोंबिवलीत प्रत्येकी दोन याप्रमाणे चार डायलिसिस केंद्रे उभारण्यात येणार आहेत. कॅथ लॅब, मॉड्युलर ओटी, पॅथालॉजी, रेडिओलाॅजीची सेवा केली जाणार आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणा बळकट केली जाणार आहे. 

जमेची बाजूमालमत्ता- ३६० कोटी रुपयेपाणीपट्टी- ७० कोटी २५ लाख रुपयेस्थानिक संस्था कर- ३०७ कोटींचे अनुदानविशेष अनुदान वसुली- २५४ कोटी रुपयेउपयोगिता सेवा कर- ७८ कोटी ५४ लाख रुपयेसंकीर्ण उत्पन्न- २० कोटी १५ लाख रुपये

खर्चाची बाजूपरिवहन व्यवस्था- ३५ कोटी रुपयेरस्ते- ४५ कोटी रुपये विद्युत व्यवस्था- ३१ कोटी रुपयेस्मशानभूमी- २ कोटी ५० लाख रुपयेनाट्यगृहे- ८ कोटी ३६ लाख रुपयेअग्निशमन दल- ८ कोटी रुपयेउड्डाणपूल- १० कोटी रुपयेउद्याने- २ कोटी ५० लाख रुपये

२०० कोटींच्या खर्चाला कात्री, अर्थसंकल्प वास्तववादी असल्याचा दावा मागील अर्थसंकल्पाच्या तुलनेत ६७४ कोटींनी यंदाचा अर्थसंकल्प कमी आहे, असे आयुक्तांनी सांगितले असले, तरी गतवर्षी १,९०० कोटींचा अर्थसंकल्प होता. यंदाच्या अर्थसंकल्पात जवळपास २०० कोटी रुपयांच्या खर्चाला कात्री लावली आहे. विकासकामे प्राधान्यक्रम ठरवून केली जातील. त्यामुळे हा अर्थसंकल्प वास्तववादी असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका