शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण स्टेशनलगत स्कायवाॅकच्या अँगलला लटकून त्याने घेतला गळफास, आत्महत्येमागील कारण अस्पष्ट

By मुरलीधर भवार | Updated: February 7, 2023 15:20 IST

Kalyan News : कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवाॅकला लटकून एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज  पहाटे घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव विठ्ठल मिसाळ असे आहे.

- मुरलीधर भवारकल्याण - स्टेशन परिसरातील स्कायवाॅकला लटकून एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज  पहाटे घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव विठ्ठल मिसाळ असे आहे. ताे मूळचा बीडचा रहिवासी आहे. या घटनेची नाेंद महात्मा फुले पाेलिसांनी केली आहे. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाेलिस त्याने आत्महत्या का केली असावी या कारणाचा शाेध घेत आहेत.

स्टेशन परिसराच्या विकासाचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु आहे. त्यामुळे स्टेशनवर वाहनांची वर्दळ असते. आज  पहाटेच्या सुमारास एक तरुण स्टेशन परिसरातील स्कायवाॅकला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. काही मंडळींनी त्याचा व्हीडीआे काढून या घटनेची माहिती तात्काळ पाेलिस आणि अग्नीशमन दलास दिली. पाेलिस आणि अग्नीशमन दलाचे जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तरुणाचा लटकलेला मृतदेह खाली उतरविला.  त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात  पाठविला आहे.

आत्महत्या करणारा तरुण हा मूळचा बीडचा रहिवासी आहे. तर ताे कल्याणला काेणत्या कारणास्तव आला हाेता. त्याला कुटुंबियांचे टेन्शन हाेते का की ताे कामाच्या शाेधात कल्याणला आला हाेता. त्याच्या हाताला काम न मिळाल्याने त्याने वैफल्यग्रस्त हाेऊन आत्महत्या केली असावी आदी विविध अंगाने पाेलिस त्याच्या आत्महत्येमागील कारणाचा शाेध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. कल्याण स्टेशन हे रेल्वेचे जंक्शन आहे. या स्टेशनात राज्यातून आणि परराज्यातून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या येत असतात. तसेच स्टेशन परिसरात फिरस्त्यांचा वापर जास्त असताे.

टॅग्स :Deathमृत्यूkalyanकल्याण