शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाक करताना घेतला अंगावरच्या कपड्याने पेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 10:03 IST

वृद्ध महिला हाेरपळली : तासाभराने मिळवले आगीवर नियंत्रण

लाेकमत न्यूज नेटवर्ककल्याण : पश्चिमेतील राैनक सिटी इमारतीच्या चाैदाव्या मजल्यावरील एका फ्लॅटला बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत रचना काैशल (६९) ही महिला हाेरपळल्याने जखमी झाली. तिला नवी मुंबईतील ऐराेली येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमुळे फ्लॅटचे प्रचंड नुकसान झाले आहे.

काैशल या भाड्याने राहतात. दुपारी त्या घरात स्वयंपाक करत असताना त्यांच्या अंगावर असलेल्या कपड्याने अचानक पेट घेतला. त्यामुळे रचना यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. ते ऐकून शेजाऱ्यांनी मदतीला धाव घेत त्यांना बाहेर काढले. प्रथम त्यांना कल्याणच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्या जास्त भाजल्या असल्याने त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात पाठवण्यात आले. त्याच वेळी आगीच्या घटनेची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलास दिली. ज्या कपड्याने पेट घेतला हाेता, ताे तेथेच राहिल्याने आग संपूर्ण घरात पसरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगीत फ्लॅटमधील सर्व वस्तूंचे नुकसान झाले आहे. 

आगीवर फवारा कमी, पाणी वायाच गेले अधिकआग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीचा पाइप फुटलेला हाेता. त्यामुळे गाडीच्या पाइपमधून आगीसाठी वापरण्यात येणारे पाणी आग विझविण्याआधीच वाया जात हाेते. हा प्रकार पाहून इमारतीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला.