शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री देसाई साहेब, जिल्हा दौऱ्यावर कधी येणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 10:09 IST

दोन ठिकाणचे पालकमंत्रिपद सांभाळताना देसाई यांना तारेवरची कसरत करावी लागते.

- मुरलीधर भवारलाेकमत न्यूज नेटवर्ककल्याण : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद २०१५ पासून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम उपक्रम आणि नगरविकास खातेही त्यांच्याकडे होते. मात्र, पालकमंत्री म्हणून शिंदे यांचे ठाणे जिल्ह्याकडे जास्त लक्ष होते. आताही आहे. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी पालकमंत्रिपदाची धुरा मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे सोपविली. देसाई यांच्याकडे सातारा आणि ठाणे जिल्ह्याची पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे.

दोन ठिकाणचे पालकमंत्रिपद सांभाळताना देसाई यांना तारेवरची कसरत करावी लागते. सप्टेंबर २०२२ मध्ये देसाई यांच्याकडे ठाणे पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर ते ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेेले नाहीत. ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांना उपस्थित होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील पदाधिकारी आता पालकमंत्री हरविल्याची टीका करत आहेत.

पालकमंत्र्यांचा एकही दौरा नाहीठाणे जिल्ह्यात पालकमंत्र्यांचा एकही दौरा झालेला नाही. मात्र, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित राहतात. त्यामध्ये त्यांनी काही प्रकरणात काम करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

चार महिन्यांत कोणत्या मंत्र्यांचे किती दौरे?केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर हे दोन वेळा ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांना पक्षाने ठाणे आणि पालघर लोकसभेची जबाबदारी दिली आहे. तिसरा दौराही अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेक वेळा ठाणे जिल्ह्यात विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आले. तसेच नवरात्र उत्सव आणि अन्य समारंभात उपस्थित राहिले आहेत.उद्योग मंत्री उदय सामंत हे एका कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीत आले होते. तसेच त्यांनी पहाटेच्या सुमारास कल्याण ग्रामीणमधील पाणीचोरी पकडण्याकरिता धाड टाकली होती. मंत्रालयात २७ गावांच्या पाण्यासंदर्भात बैठक घेतली होती.

ठाणे जिल्ह्यात पालकमंत्र्यांचा दौरा होणे अपेक्षित आहे. मात्र, दौरा झालेला नाही. दौरा करण्यात यावा, यासाठी लेखी मागणी केली होती.    -प्रेमनाथ म्हात्रे, भाजप जिल्हाध्यक्ष, कल्याण.

जिल्ह्यात पालकमंत्र्यांचे दौरे किती झाले, याची माहिती घेऊन सांगतो. मात्र, पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहतात.    -गोपाळ लांडगे, जिल्हाध्यक्ष, शिंदे गट  

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाई