शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

27 गावांतील नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांची गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 00:56 IST

महापालिकेतून वगळलेल्या गावांना कमी एफएसआयची आवई; समान डीसी रुल्समुळे समान एफएसआय मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : राज्य सरकारने समान विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल्स) डिसेंबरपासून लागू केल्याने राज्यातील सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांना विकासाकरिता एकसारखाच एफएसआय मिळणार आहे. त्यामुळे गावे महापालिकेतून वगळल्यास कमी एफएसआय मिळेल, अशी दिशाभूल करणाऱ्यांची चांगलीच गोची झाल्याचे सर्वपक्षीय २७ गाव संघर्ष समितीने नमूद केले आहे.केडीएमसीतील २७ गावे वगळून स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची मागणी होती. समितीच्या या मागणीला राज्य सरकारने बगल देत २७ पैकी १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची अधिसूचना काढली. त्याची प्रक्रिया सुरू केली. या अधिसूचनेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र २७ गाव सर्वपक्षीय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा १८ गावांचे दौरे करून गावकऱ्यांचे मत तपासले. महापालिकेत ठेवलेल्या नऊ गावांचा दौरा समितीच्या वतीने लवकर केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील दौऱ्यादरम्यान अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, अजरून चौधरी, बळीराम तरे, रंगनाथ ठाकूर, दत्ता वझे, भगवान पाटील आदी सहभागी झाले होते.१२ मार्च रोजी न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी आहे. त्यापूर्वीच नऊ गावांचा दौरा पार पाडला जाईल. त्यानंतर याचिकेसंदर्भातील तज्ज्ञ वकिलांना काही माहिती पुरविली जाईल, अशी माहिती समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी दिली.सरचिटणीस पाटील म्हणाले की, गावे वगळण्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, महापालिकेने २७ गावांतील मालमत्ताधारकांना १० पटीने कर लावला आहे. हा कर भर नाहीतर घर सोडून हवे तर माळरानावर राहण्यासाठी जाऊ, असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. भाल गावात ६५० एकर जागेवर डंपिंगचे आरक्षण टाकण्यात आले होते. त्यापैकी ४५० एकर जागेवरील आरक्षण हटविण्यात समितीच्या पाठपुराव्याला यश आले आहे. उर्वरित २०० एकर जागेवरील डंपिंगचे आरक्षण उठविण्यासाठी समिती पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका