शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मस्तच! कचऱ्याच्या जागी फुलणार नंदनवन; कल्याणच्या आधारवाडी डम्पिंगवर होणार जबरदस्त गार्डन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 20:13 IST

कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड आता बंद झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण परिसरातील नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.

कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड आता बंद झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण परिसरातील नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ज्या ठिकाणी गेली अनेक वर्ष कचऱ्याचं साम्राज्य होतं. जिथं चुकूनही कुणी फिरकायचं नाही आता त्याठिकाणी पालिका सुंदर उद्यानाची निर्मिती करणार आहे. 

आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड केवळ बंद केल्याची घोषणा कल्याण-डोंबिवली महापालिकेने केलेली नाही. तर त्याठिकाणी येत्या काळात सुंदर असं गार्डन तयार केलं जाणार असल्याची माहिती खुद्द पालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. काल २५ मेपासून आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड कायमस्वरुपी बंद करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर आज विजय सूर्यवंशी यांनी या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्यासह अधिकारी ऑगस्टीन घुटे, जनसंपर्क अधिकारी माधवी फोफळे उपस्थित होते. 

"आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद झालं ही खूप मोठी आणि चांगली बातमी आहे. आता या जागेवरील सगळा कचरा बायोमायनिंग पद्धतीने हटविला जाईल. या जागेवर उद्यान, सायकलिंग ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक विकसित केला जाणार आहे", अशी घोषणा सूर्यवंशी यांनी केली. यासोबतच परिसरात बिल्डींग परवानगी देताना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या अटी त्यामध्ये अंतर्भूत असतात, परंतु या अटी पालन न केल्यास संबंधित विकासकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देखील केडीएमसी आयुक्तांनी यावेळी दिला. आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंड बंद केल्यामुळे उंबर्डे आणि बारावे येथे कचरा प्रक्रिया करण्यात येईल . यापूर्वी कचऱ्याचे वर्गीकरण व्यवस्थित होत नव्हते,आता ओला कचरा हा आता बायोगॅस  व कंपोस्टिंग साठी पाठवला जातो आणि सुका कचरा उचलण्यासाठी या एजन्सी पुढे आलेल्या आहेत आणि त्यांचेकडून महानगरपालिकला रॉयल्टी देखील मिळते अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका