शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

स्मार्ट सिटी प्रकल्पाचे भवितव्य आता जयस्वाल यांच्या हाती, तीन वर्षांत प्रकल्प पूर्णत्वाला नेण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 05:43 IST

Smart City project : ‘प्रोजेक्ट मॅन’ अशी ख्याती असलेल्या जयस्वाल यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांना गती मिळेल, असे अधिकाऱ्यांना वाटत आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अध्यक्षपदी संजीव जयस्वाल यांची निवड करण्यात आल्याने हा रखडलेला प्रकल्प मार्गी लागेल, अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे. दीड हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्णत्वाला नेण्याचे आव्हान जयस्वाल यांच्यापुढे आहे. ‘प्रोजेक्ट मॅन’ अशी ख्याती असलेल्या जयस्वाल यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांना गती मिळेल, असे अधिकाऱ्यांना वाटत आहे. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी जयस्वाल यांच्याकडे आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ही मोठी जबाबदारी आहे. त्यातूनही स्मार्ट सिटीच्या बैठकांना ते अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची २०१६ मध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाली. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत घनकचरा व्यवस्थापन, शहरातील सिग्नल यंत्रणा, सीसीटीव्ही बसविणे, कल्याण स्टेशन परिसराचा विकास, सिटी पार्क, खाडी परिसराचा विकास आदी २५ प्रकल्प आहेत. त्यापैकी कल्याण स्टेशन परिसराच्या विकासाचा प्रारंभ झाला आहे. सिटी पार्क, सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे. कल्याणमध्ये काही ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. हे प्रकल्प पाच वर्षांच्या मुदतीत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, निविदा मागविणे आदी प्रक्रिया करण्यात वेळ गेला. स्मार्ट सिटी प्रकल्प महापालिकेच्या हद्दीत राबविले जात असले तरी हे प्रकल्प एमएमआरडीएच्या अंतर्गत सुरू आहेत. एमएमआरडीएचे आयुक्त हे कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्प कंपनीचे अध्यक्ष होते.

दोन वर्षांपासून पद रिक्तदोन वर्षांपासून अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे प्रकल्पाची गती मंदावली होती. कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील स्मार्ट सिटी प्रकल्पांना गती देण्यासाठी सरकारने जयस्वाल यांच्यासारख्या प्रोजेक्ट मॅनची अध्यक्षपदी निवड केली आहे. स्मार्ट सिटीचे प्रकल्प ३६ महिन्यांत अर्थात तीन वर्षांत मार्गी लावायचे आहेत. त्याची डेडलाइन २०२३ आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली