शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेवर केडीएमसी निवडणुकीचे भवितव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 05:22 IST

जाणकारांचे मत : डिसेंबर-जानेवारीत लाटेची शक्यता

 लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण :  कोरोनामुळे केडीएमसीची निवडणूक लांबणीवर पडली आहे. मार्च-एप्रिलमध्ये निवडणूक होण्याचे संकेत मिळत आहेत. एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असताना दुसरीकडे डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी केडीएमसी निवडणुकीचे भवितव्य या लाटेवरच अवलंबून असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

ऑक्टोबर २०१५ मध्ये केडीएमसीची निवडणूक झाली होती. त्यामुळे पाच वर्षांनंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणे अपेक्षित होते. कोरोनामुळे महापालिकेची निवडणूक अद्याप होऊ शकलेली नाही. नगरसेवकांची मुदत संपल्याने सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या प्रादुर्भावात महापालिकेची निवडणूक मार्च-एप्रिलमध्ये होण्याचे संकेत आहेत. निवडणुकीची तारीख केव्हा जाहीर होईल, याबाबत उत्सुकता लागून राहिली असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार प्रभागरचनेचे काम पूर्ण झाले आहे. त्यात सध्या कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या पाहता जानेवारीनंतर निवडणूक होईल, अशीही चर्चा होऊ लागली आहे. प्रभागरचनेला आयोगाने मान्यता दिल्यानंतर त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात येतील. नंतर, प्रभागांची आरक्षण सोडत होईल. त्यामुळे या प्रक्रियेला लागणारा कालावधी पाहता निवडणुकीला फेब्रुवारीनंतरच मुहूर्त मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

असे आहेत मतप्रवाह n दुसरीकडे डिसेंबर आणि जानेवारीमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संभव असल्याने त्यावरच निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असेल, असे जाणकारांचे मत आहे. n यात दुसरी लाट येईल का? लाट आली तर तिचा प्रभाव किती राहील, यावरही निवडणुकीचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतला जाईल, असाही मतप्रवाह आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका