शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवासात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 23:56 IST

स्टीकर्सना कुणी नाही जुमानत

डोंबिवली  :  दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारी यंत्रणांपुढील पेच वाढला आहे. त्यातच लोकलचे प्रवासीही वाढल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडत आहे. त्यामुळे दोन प्रवाशांमध्ये अंतर राखण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले होते. एकाआड एक आसन सोडून बसण्याबाबत जनजागृती करण्यासाठी आसनांना स्टीकर्स लावण्यात आले. मात्र, त्यांचा काहीही फायदा झाला नसल्याचे दिसून येत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आधी एसटी तसेच विविध महापालिकांच्या परिवहनसेवेच्या बसमध्येही लहान आसनांवर एक, तर मोठ्या आसनांवर दोन प्रवाशांनी बसून प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले. मात्र, वाढत्या प्रवाशांच्या लोंढ्यामुळे या नियमांचे पालन करणे शक्य झाले नाही. 

लोकलमध्येही सकाळी आणि सायंकाळी ठरावीक वेळेला प्रवाशांची गर्दी होत आहे. मिळेल त्या लोकलने प्रवास करताना प्रवासी डब्यांतील गर्दीचा विचार करत नाहीत. तसेच जागा असेल तिथे ते बसतात. प्रवासात सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे, एकमेकांच्या बाजूला खेटून प्रवाशांनी बसू नये, यासाठी स्टीकर्स लावलेले असले, तरी त्याचे पालन करण्याकडे प्रवाशांचा कल नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, शिस्त लावण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत प्रवासी संघटनांनी व्यक्त केले.  लोकलच्या आसनांवर स्टीकर्स लावून जागृती होईल, पण नियमांचे पालन मात्र होणार नाही. त्यामुळे प्रवाशांनीही सावधगिरी बाळगून  प्रवास करावा, रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनदेखील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

‘सर्वांसाठी लोकल सुरू करा’nसर्वांसाठी लोकल सुरू करावी, या मागणीसाठी उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी बुधवारी राज्य शासनाच्या आपत्ती विभागाच्या सचिवांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या मागण्यांचे निवेदन देशमुख यांनी त्यांना दिले. त्यावर त्यांनीही बघू, करू, असे आश्वासन दिल्याचे देशमुख म्हणाले. प्रवासी संघटनेची बाजू ऐकून घेतल्याबद्दल त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली