शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांचं बाळ आजोबांच्या हातून निसटलं अन् नाल्यात वाहून गेलं, ठाकुर्ली-कल्याण रेल्वे मार्गावरील घटना

By अनिकेत घमंडी | Updated: July 19, 2023 17:35 IST

योगीता शंकर रुमाल (25) असे संबंधित पालकाचे नाव आहे. त्या भिंवंडी येथील आहेत. तसेच वाहून गेलेले बाळ हे चार महिन्यांची मुलगी असल्याचे समजते.

डोंबिवली : आजोबांकडून (आईचे वडील) चार महिन्याचे बाळ नाल्यात पडून वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना ठाकुर्ली-कल्याण रेल्वे मार्गावरील नाल्यावर घडल्याची प्राथमिक माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली आहे. योगीता शंकर रुमाल (२५) असे संबंधित पालकाचे नाव आहे. त्या भिंवंडी येथील आहेत. तसेच वाहून गेलेले बाळ हे चार महिन्यांची मुलगी असल्याचे समजते. 

कल्याण आणि डोंबिवली परिसरात आज सकाळपासूनच सुरू असलेल्या दमदार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्या ट्रॅकवर ऊभ्या होत्या. अंबरनाथ लोकल वाहतूकही ठप्प झाली होती. अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान जवळपास दोन तास उभी होती. लोक उभी असल्याने काही प्रवासी गाडीतून उतरुन ट्रॅकवरुन कल्यानच्या दिशेने चालत जात होते. याच दरम्यान ही दूर्दैवी घटना घडली.

आजोबांच्या हातून निसटलं बाळ -कल्याणच्या दिशेने जात असलेल्या या प्रवाशांमध्ये एक आजोबा संबंधित चार महिन्यांच्या बाळाला घेऊन चालत होते. सोबत बाळाची आईही होती. मात्र अचानक आजोबांच्या हातून बाळ निसटून नाल्यात पडले आणि वाहून गेले. यानंतर काही लोकांनी नाल्याच्या दुसऱ्या बाजुला जाऊन ते बाळ शोधण्याचाही प्रयत्न केला. मात्र बाळ सापडले नाही.राज्यासह मुंबई परिसरात मुसळधार पाऊस -राज्यभरात मुंबई आणि परिसरात आज पहाटेपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. याशिवाय पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर, वाशीम, गडचिरोली आदी ठिकाणीही जोरदार पाऊस होत आहे. हवामान विभागाने मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील जारी केला आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १९ जुलैसाठी पालघर, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे तर मुंबई, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हवामान विभाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. २० जुलै रोजीही मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. २१ जुलै रोजी पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीRainपाऊसdrowningपाण्यात बुडणे