शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर; जितेंद्र आव्हाड यांची घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 15:57 IST

स्वत: पाटील यांनी ते पाच सहा नगरसेवकांना घेऊन राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचे भेटी पश्चात सांगितले.

कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज कार्यकर्ता मेळावा होता. या मेळाव्यास गृह निर्माण जितेंद्र  आव्हाड आले होते. यावेळी माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी आव्हाड यांची भेट घेतली. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

स्वत:  पाटील यांनी ते पाच सहा नगरसेवकांना घेऊन राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचे भेटी पश्चात सांगितले. 2015 साली पाटील हे अपक्ष नगरसेवक पदी आडीवली ढोकळी प्रभागातून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपला समर्थन केले होते. पाटील यांनी आव्हाड यांची भेट घेतल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहे. याबाबत आव्हाड यांना विचारणा केली करण्यात की निवडणूकीच्या तोंडावर आणखीन किती नगरसेवक तुमच्या संपर्कात आहेत. तर त्यावर आव्हाड यांनी सांगितले की, कोण आमच्या संपर्कात आहे हे आधीच सांगितले तर आमचे राजकारण संपुष्टात येईल. त्यामुळे वेळ आल्यावर आमच्याकडे कोण येणार हे लवकर समजणार आहे. 

निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेने आधीच मिशन लोटसला धक्का देत आत्तार्पयत चार नगरसेवक भाजपचे फोडले आहे. भाजपच्या महेश पाटील, सुनीता पाटील, सायली विचारे आणि विशाल पावशे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ही फोडाफोड पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृ़त्वाखाली कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुरु करुन शिवसेनेत भाजपच्या नगरसेवकांना घेण्याची सुरुवात केली आहे. तर आव्हाड यांनी 2015 साली राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकाना पुन्हा राष्ट्रवादीत घेण्याची खेळी सुरु केली आहे. त्यामुळे शिवसेनेत गेलेले नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत येणार का याविषयी चर्चा सुरु झाली आहे.

शिवसेना मिशन लोटसला डॅमेज करीत आहे तर आव्हाड हे शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत खेचण्याचे काम करीत आहेत. ठाण्यात आव्हाड विरुद्ध शिंदे असे राजकारण विविध मुद्यावरुन रंगलेले असताना आत्ता कल्याण डोंबिवलीतही शिवसेनेच्या पाठोपाठ आव्हाड यांनी मिशन कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादी मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. याठिकाणीही त्यांचा सामना शिंदे यांच्यासोबत होणार असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणNCPराष्ट्रवादी काँग्रेस