शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा एमआयडीसी कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन; भाजपाचा इशारा

By अनिकेत घमंडी | Updated: November 24, 2022 16:17 IST

पाणी नसल्याने त्रस्त असलेल्या नंदिवली टेकडीवर राहणाऱ्या सुप्रिया कुलकर्णी या महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तक्रारकेली आहे.

 डोंबिवली: २७ गावात पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झाले असून दिवाळी दरम्यान केवळ कागदावर पाणी वाढले पण प्रत्यक्षात मात्र नेत्यांच्या अन नागरिकांच्या तोंडचे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी पळवले असल्याची टीका भाजप डोंबिवली ग्रामीण पदाधिकारी नंदू परब यांनी।केली. पंधरा दिवसात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाहीतर मात्र एमआयडीसी कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिली.

कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी भाजपने २७ गावात भेडसावणाऱ्या पाणी टंचाई बद्दल एमआयडीसी अधिकार्यांची भेट घेऊन अडचणी सांगितल्या. पाणी नाही म्हणून नागरिकांचा त्या ठिकाणी जीव गेला आहे त्याची जाण ठेवा, जे सुरू आहे ते योग्य नाही, राजकारण पाण्याचे करू नका असे मत माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर म्हणाले. नागरिकांना पाणी ही मूलभुत गरज असून ते द्यायलाच हवे असेही ते म्हणाले. मनपाने कर भरला नाही भरला ही काहीही तांत्रिक कारण सांगू नका, असेही ते म्हणाले.

पाणी हक्क असून तो सगळ्याना मिळायला हवा , पाऊस भरपूर झाला आहे, धरण भरलेली आहेत, जिल्ह्यात ग्रामीण भाग वगळता सर्वत्र पाणी मिळते असे असताना २७ गाव पाण्यापासून वंचित ठेवू नका असे मत भाजपचे पदाधिकारी अमर माळी यांनी व्यक्त।केले. महिलांच्या समस्या जाणून घ्या, जरा गावागावात फिरा, एसी दालनात बसून त्या समस्या सुटणार नाहीत, कळणार नाहीत. आबालवृद्ध नागरिकांचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत, जरा डोकं ठिकाणावर ठेवून प्रामाणिक काम करा, इथे यायच म्हंटल तरी बंधन असतात, नागरिकांसाठी कार्यालय बनवलं असून अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार थाम्बवा अन्यथा आंदोलन करावेच लागेल असा इशारा महिला मोर्चा अध्यक्षा मनीषा राणे यांनी दिला.

नागरिक शांत आहेत याचा फायदा घेऊ नका, कळशी हंडा आंदोलन केले ना तर मात्र त्याला अधिकारी जबाबदार असतील असेही सगळ्यानी स्पष्ट केले. पाणी नसल्याने त्रस्त असलेल्या नंदिवली टेकडीवर राहणाऱ्या सुप्रिया कुलकर्णी या महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तक्रार।केली आहे. पाणी नाही, रस्ते नाही, कचऱ्याची समस्या आहेच मग या ठिकाणी मिळते काय? केवळ धूळधाण का असा सवाल त्यांनी माध्यमांशी बोलताना।केला. पीएमओला पत्र, तक्रार पाठवून काही फरक पडतो का ते बघायचे असा सवाल त्यांनी केला. त्या परिसरात आठवडा भरापासून पाण्याची समस्या वाढली असून मनपाकडे तक्रारी करून हैराण झाल्याने पीएमओ कार्यालयाकडे दाद मगितल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका