शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कामावरून काढले; बदला घेण्यासाठी दुकानातच केली चोरी

By प्रशांत माने | Updated: June 30, 2023 16:41 IST

कर्जबाजारी नोकराचे कृत्य.

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: कामावरून काढल्याने त्याचा बदला घेण्यासाठी नोकराने त्याच दुकानात चोरी केल्याची घटना समोर आली आहे. रामनगर पोलिसांनी त्याला अटक केली असून विकास नाना बरबटे (वय ३५) रा. दावडी असे त्याचे नाव आहे. कामावरून काढून टाकल्याने तो कर्जबाजारी झाला त्यातून त्याने ही चोरी केली.

पुर्वेकडील एका चिकन शॉपचे शटर बनावट चावीने उघडून दुकानातील १८ हजारांची रोकड व मोबाईल लंपास केल्याची घटना २२ जूनला घडली होती. विकास याच दुकानात कामाला होता. चार महिन्यांपूर्वी दुकान मालकाने त्याला कामावरून काढून टाकले होते. काम नसल्याने तो बेरोजगार झाला होता. याचा राग विकासला होता. एकीकडे काम मिळत नसताना त्याच्यावर कर्ज देखील वाढले होते. दऱम्यान चोरी करताना विकास सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला होता. तो दुकानाच्या परिसरात तोंड बांधून संशयीतरीत्या फिरत होता. हे कॅमेराचे फुटेज दुकान मालकाला दाखविले असता संबंधित व्यक्ती विकास असल्याची माहीती त्यांनी पोलिसांना दिली. रामनगर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश सानप, पोलिस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, नितीन सांगळे, शिवाजी राठोड यांच्या पथकाने सीसीटिव्ही व तांत्रिक मदतीने विकास ला दावडी, सोनारपाडा परिसरातून अटक केली.

त्याच्याकडून गुन्हयातील चोरी केलेला मोबाईल आणि रोकड असा २५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली. कामावरून काढून टाकल्यामुळे त्याचा बदला घेण्याकरीता तसेच कर्जामुळे हा गुन्हा केल्याची कबुली विकासने दिल्याचीही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी