शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Dombivli MIDC Explosion डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा आग, इंडो अमाईन कंपनीत स्फोट, नागरिकांत घबराट

By अनिकेत घमंडी | Updated: June 12, 2024 10:46 IST

घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा पोहोचली असून आग शमवण्याचे कार्य सुरू झाले आहे.

डोंबिवली : डोंबिवलीएमआयडीसीमध्ये गेल्याच महिन्यात अंबर केमिकल कंपनीत रिएक्टर स्फोटाची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच आता बुधवारी पुन्हा येथील इंडो अमाईन आणि अन्य एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. येथील अभिनव शाळेजवळ ही घटना घडल्याने त्या शाळेचे विद्यार्थी आणि येथील परीसरात असलेल्या नागरिकांत घबराट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत स्फोट झाला आणि आगीची घटना घडली. यानंतर कंपनीतील कामगारांनी एकच पळ काढला असून वातावरण तंग झाले आहे. दरम्यान, पुन्हा काळ्या धुराने डोंबिवली शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच केमिकल कंपन्या हटवायची मागणी होत असताना आगीचे सत्र थांबत नसल्याने भयाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे एमआयडीसीचे रहिवासी दडपणाखाली आहेत. 

दरम्यान, सोशल मोडियावर क्षणात व्हिडीओ, फोटो व्हायरल झाल्याने विविध कंपन्यांनी तातडीने सगळ्या कामगारांना सुरक्षित पणे बाहेर काढले असून जिथे घटना घडली, तिथे कोणी अडकले आहेत की नाही याची माहिती मिळू शकत नाही आहे. पण तरी कामगार देखील घाबरले आहेत असे दिसून येत आहे. घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा पोहोचली असून आग शमवण्याचे कार्य सुरू झाले आहे.

इंडो अमाईन कंपनीला आग लागली आहे, आग विझवण्याचे काम सुरू असून घटनास्थळी भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्व यंत्रणा कार्यरत झाल्याने मदतकार्य सुरू झाले आहे, मी स्वतः घटनास्थळी आहे. - भाऊसाहेब चौधरी, सचिव, शिवसेना, आणि उद्योजक

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसीfireआग