शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर झोपी गेलेले जागे झाले! पाणी चोरणाऱ्या १२ सर्व्हिस सेंटरवर कारवाई

By प्रशांत माने | Updated: March 15, 2023 17:13 IST

काही दिवसांपासून डोंबिवलीच्या ग्रामीण भागात पाणी कमी दाबाने किंवा येत नसल्याची तक्रार उद्योगमंत्री सामंत यांना मिळाली होती.

डोंबिवली: एरव्ही पाणी चोरीकडे दुर्लक्ष करणारे केडीएमसी आणि एमआयडीसी प्रशासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी मध्यरात्री टाकलेल्या धाडीनंतर खडबडुन जागे झाले असून पाणी चोरणाऱ्या १२ सर्व्हिस सेंटरसह अनधिकृत कनेक्शन प्रकरणी एकाच्या विरोधात यंत्रणांकडून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

काही दिवसांपासून डोंबिवलीच्या ग्रामीण भागात पाणी कमी दाबाने किंवा येत नसल्याची तक्रार उद्योगमंत्री सामंत यांना मिळाली होती. त्याची दखल घेत सामंत यांनी अचानक मध्यरात्री डोंबिवली ग्रामीण परिसरात धाड टाकत टँकर माफीयांच्या वतीने सुरु असलेल्या पाणी चोरीचा पर्दाफाश केला होता. दरम्यान केडीएमसीच्या अधिका-यांनी त्याठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. यातून महापालिकेच्या कनेक्शनवरून कोणताही अनधिकृत टँकर किंवा पाणीपुरवठा होत नाही असा दावा केला आहे. यावरून मंत्री सामंत यांनी टाकलेली धाड फोल ठरली का अशी  चर्चा रंगली असली तरी मंत्र्यांनी टाकलेल्या अचानक धाडीने  झोपी गेलेल्या सरकारी यंत्रणांना अखेर जाग आल्याचे पाणीचोरी प्रकरणी दाखल केलेल्या गुन्हयांच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे. पाणी चोरणा-या तब्बल १२ सर्व्हिस सेंटर चालविणा-यांवरोधात गुन्हे नोंदवले गेले आहेत.बदलापूर-पाईप लाईन रोडवरील खोणी, कोळेगाव, रूक्मिणीनगर, हेदुटणे, धामटण या परिसरात ही कारवाई करण्यात आली. डोंबिवली एमआयडीसी येथील कंपन्यांना, केडीएमसी अंतर्गत येणारी २७ गावे आणि इतर गृहसंकुले यांना पाणी पुरवठा करणा-या तीन मुख्य जलवाहीन्यांना टॅपिंग मारून सर्व्हिस सेंटर चालक पाणी चोरून वापरत असल्याचे कारवाईत उघड झाले. तर ई प्रभाग क्षेत्र परिक्षेत्रातील संदप रोड परिसरात अनधिकृत रित्या कनेक्शन घेऊन पाणी चोरी करणा-याविरोधात देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीUday Samantउदय सामंत