शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यामुळे हे शक्य - डॉ. विजय सुर्यवंशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 14:33 IST

केडीएमसीच्या कोरोना लढ्यावर आधारित गौतम कोतवाल लिखित कॅप्टन कूल कूल पुस्तकाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

कल्याण : कोविडने केडीएमसी प्रशासनाला कामं करण्याची सकारात्मक मानसिकता दिली. कोविडशी यशस्वी लढा देण्यासोबतच आम्ही शहर विकासासाठीही अक्षरशः झपाटल्याप्रमाणे काम करू शकलो. हे केवळ आपल्या एकट्यामुळे नव्हे तर महापालिकेच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यामुळे शक्य झाले, असे मत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त आणि तत्कालीन केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. केडीएमसीच्या कोरोना लढ्यावर आधारित गौतम कोतवाल लिखित कॅप्टन कूल कूल पुस्तकाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कल्याणच्या के.सी. गांधी शाळेच्या सी.एम. गांधी ऑडीटोरियममध्ये झालेल्या या दिमाखदार सोहळ्याला शहरातील अनेक मान्यवर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि केडीएमसी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

कॅप्टन कूल कल्याण डोंबिवली महापालिकेचा करोना विरोधी लढा’ हे पुस्तक ग्रीन वर्ल्ड प्रकाशनाचे गौतम कोतवाल यांनी लिहिले आहे. कोवीड काळात तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी कल्याण डोंबिवलीतील खासगी डॉक्टर, सामाजिक संस्था आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने कशाप्रकारे आरोग्य यंत्रणा उभारून कोवीडला हरवले याचे यथार्थ वर्णन या पुस्तकात करण्यात आले आहे.

दरम्यान, कोविड काळात दिलेल्या सेवेबद्दल कल्याण नागरी सत्कार समितीतर्फे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , डॉ. विजय सुर्यवंशी आणि डॉ. प्रशांत पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

- महाराष्ट्रात कोविडचा सर्वात पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीत दगावला. मात्र त्यानंतरही हिंमत न हारता आम्ही तत्काललीन पालकमंत्री आणि विद्यमान मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कमी वेळात जंबो कोविड हॉस्पिटल उभारून एकही रुग्ण उपचाराशिवाय राहणार नाही याची खबरदारी घेतली. सर्वाधिक रुग्ण असूनही कल्याण डोंबिवलीचा मृत्युदर मात्र कमी ठेवण्यात आम्हाला यश मिळाल्याचे समाधान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

- कोविडने आपल्याला भरपूर काही शिकवले. समोर कितीही मोठा शत्रू किंवा संकट असेल तरी आपण सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न केल्यास त्याला नक्कीच हरवू शकतो हा विश्वास कोविडने दिल्याची भावना डॉक्टर आर्मीचे प्रमूख आणि इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. कोविड काळात आम्ही अनेक गोड आणि कटू आठवणींचा अनुभव घेतला असेही ते म्हणाले. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका