शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पंधरा डब्यांची लोकल कागदावरच; प्रस्ताव पडूनच, आर्थिक हितसंबंधांमुळे एसी लोकलची भलावण सुरू

By अनिकेत घमंडी | Updated: June 27, 2024 10:29 IST

टिटवाळा व बदलापूर येथून १५ डब्यांच्या लोकल सोडण्याचा प्रस्ताव सहा वर्षे कागदावर असून आर्थिक हितसंबंधांमुळे एसी लोकलची भलावण केली जात आहे.

 अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: गर्दीने ओसंडून वाहणारी आणि अस्वच्छतेने बरबटलेली रेल्वे स्थानके, स्वच्छतागृह नावाचे उकिरडे, दरवाजात लटकलेले प्रवासी असा प्रचंड शारीरिक वेदना आणि भयंकर मनस्ताप देणारा प्रवास नाईलाज म्हणून ठाणे जिल्ह्यातील २१ लाख चाकरमानी दररोज करतात. गर्दीत हात सुटला तर मृत्यूला कवटाळतात. टिटवाळा व बदलापूर येथून १५ डब्यांच्या लोकल सोडण्याचा प्रस्ताव सहा वर्षे कागदावर असून आर्थिक हितसंबंधांमुळे एसी लोकलची भलावण केली जात आहे. कधीही लोकल वेळेवर चालवल्या जात नाहीत, सदानकदा तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवा कोलमडलेली असते. कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, उल्हानसगर, कल्याण, ठाकुर्ली, टिटवाळा, आसनगाव, कसारा, शहाड, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे या स्थानकांमधील प्रवाशांपैकी कुणी ना कुणी रेल्वेतून पडून होणारे अपघात नित्याचे झाले आहेत. सहप्रवासी क्षणिक दुःख व्यक्त करून पुन्हा पुढच्या प्रवासाला लागतात. घरातून सकाळी निघालेला माणूस पुन्हा घरी येईल याची शाश्वती नसते. किंबहुना तशी मानसिक तयारी करुन रेल्वेचा प्रवास करावा लागतो. वर्षानुवर्षे असेच सुरू आहे.

९४ पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यूलोहमार्ग पोलिसांकडील माहितीनुसार, जानेवारीपासून आतापर्यंत मध्य रेल्वेच्या लोकल  मधून गर्दीमुळे पडून ९४ हून अधिक प्रवासी मरण पावले. अनेक जणांना अपंगत्व आले. 

प्रकल्प अडकला ?लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे दररोज किमान एक ते दोन प्रवाशांचा मृत्यू होतो. काहींना कायमचे अपंगत्व येते. प्रवासी वहन क्षमता तत्काळ वाढविण्यासाठी १५ डबा लोकल फेऱ्या वाढवणे गरजेचे आहे.

मागील दहा वर्षांत एकही लोकल रेल्वेच्या ताफ्यात आलेली नाही. त्यामुळेच ठाणे व कल्याणवरून कर्जत व कसाऱ्यासाठी एकही लोकल वाढलेली नाही. गर्दीच्या विभाजन नियंत्रणाचे कोणतेही नियोजन न करता एसी लोकल लादण्याचा रेल्वेच्या कमिशन बाज अधिकाऱ्यांचा डाव आहे. बदलापूर व टिटवाळा येथून १५ डबा लोकल चालविण्याचा प्रकल्प मुद्दाम प्रलंबित ठेवला आहे. - मनोहर शेलार, संस्थापक अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ

४२५ कोटी रुपयांचा प्रकल्प सहा वर्षे कागदावर- पाचवा, सहावा मार्ग शोभेचा ठरला असून कोट्यवधी रुपये वाया गेले. कल्याण ते मुंबई १५ डब्यांची लोकल सुरू केल्यानंतरही वाढणारी गर्दी व नियमित होणारे अपघात पाहून टर्मिनल स्थानके असलेल्या बदलापूर व टिटवाळा येथील सर्व लोकल १५ डब्यांच्या कराव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवासी महासंघाने मध्य रेल्वे प्रशासन आणि रेल्वे बोर्डाकडे केली. - रेल्वे प्रशासनाने यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून तो रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवून सहा वर्षे झाली. मात्र अजून त्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली नाही. - ४२५ कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पात शहाड, आंबिवली, टिटवाळा, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांची लांबी वाढवणे, सिग्नल यंत्रणा बदलणे या प्रमुख कामांसह अन्य प्रवासी सुविधांचा समावेश आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीrailwayरेल्वे