शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘पैसा महत्त्वाचा झाल्यानेच शेतकरी कर्जबाजारी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 08:07 IST

दी कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भागवत उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : पैसा ही एक व्यवस्था आहे ती आवश्यक असली तरी ती कृत्रिम आहे. पैसा खाऊन पोट भरले जात नाही, त्यासाठी अन्नच खावे लागते. या सर्व व्यवस्थेत माध्यम म्हणून पैशांचा उपयोग आहे. मात्र, हल्लीच्या आधुनिक जगात पैसा महत्त्वाचा होत असून, वस्तूचे महत्त्व घटत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी अन्न पिकविणारा शेतकरी मात्र कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असल्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी वाढत्या शेतकरी आत्महत्यांबाबत अप्रत्यक्षपणे तीव्र नाराजी व्यक्त केली.

दी कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भागवत उपस्थित होते. बँकेच्या ‘सुवर्णबंध’ या स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष सचिन आंबेकर आणि बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अनंत कुलकर्णी उपस्थित होते. 

कल्याण बँकेचे अभिनंदनजगातील दु:ख, दारिद्र्य आणि शोषण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आर्थिक जगातील कार्यकर्त्यांना कार्य करावे लागणार आहे. शहरात आणि ग्रामीण भागात असलेल्या छोट्या-छोट्या लोकांना पैशांची गरज असते. या लहान-लहान काम करणाऱ्या लोकांच्या आर्थिक दुबळेपणाचे निवारण करणे या मूळ उद्देशानेच महाराष्ट्रात सहकारी बँकांना सुरुवात झाली आणि लहान-लहान लोकांच्या मनामध्ये परमेश्वर जागरूक असून, त्यामुळे कर्ज बुडवायचाही विचार करत नाही, तो वेळेवर कर्जाची परतफेड करत असल्याचेही त्यांनी सांगितले. कल्याण जनता बँकेचे भागवत यांनी अभिनंदन केले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत