शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
4
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
5
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
6
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
7
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
8
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
9
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
10
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
11
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
12
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
13
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
14
'सैराट'मधील इंटिमेट सीनबद्दल पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू, म्हणाली- "मी घाबरले होते, पण..."
15
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
16
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
17
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
19
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत आरक्षणानंतरही अनेकांचे राजकीय भवितव्य धूसर

By मुरलीधर भवार | Updated: November 12, 2025 13:23 IST

KDMC Election: कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक प्रथमच बहुसदस्यीय पद्धतीने होत असल्याने व प्रभागांतर्गत सीमारेषा निश्चित झाल्या नसल्याने आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतरही इच्छुकांना पत्ता कट झालाय की, आपल्याकरिता एखादा सुरक्षित वॉर्ड उपलब्ध झाला, याचा अंदाज बांधता आला नाही.

- मुरलीधर भवारकल्याण  - कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक प्रथमच बहुसदस्यीय पद्धतीने होत असल्याने व प्रभागांतर्गत सीमारेषा निश्चित झाल्या नसल्याने आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतरही इच्छुकांना पत्ता कट झालाय की, आपल्याकरिता एखादा सुरक्षित वॉर्ड उपलब्ध झाला, याचा अंदाज बांधता आला नाही. पक्षात वजन असलेले व गडगंज पैसा असलेले इच्छुक प्रभागातील त्यांना अनुकूल वॉर्डावर दावा सांगतील, अशी भावना काही माजी नगरसेवकांनी व्यक्त केली. प्रस्थापित सोय लावून घेतील. 

प्रभागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ वॉर्डांचे आरक्षण जाहीर झाले. मात्र, प्रभागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ या वॉर्डांना नाव दिलेले नाही. अंतर्गत सीमारेषा निश्चित केलेल्या नाही. त्यामुळे जाहीर केलेले आरक्षण नेमके कोणाचे नशीब उजळवणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. १२२ जागांकरिता ३१ पॅनलमध्ये ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’नुसार आरक्षणाची सोडत जाहीर केली. आरक्षणाचे नेमके परिणाम कसे होणार, हेच अनेकांना न उमजल्याने आरक्षण सोडतीच्या ठिकाणी काहीसे उदासीनतेचे वातावरण होते.  

२ डिसेंबरला अंतिम प्रारूपआरक्षण सोडतीवर हरकती व सूचना घेण्याकरिता १७ ते २४ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. हरकती पश्चात निवडणूक आयोगाला अंतिम मान्यतेसाठी प्रभाग आरक्षणाचे प्रारूप पाठवले जाईल. आयोगाच्या अंतिम मान्यतेनंतर २ डिसेंबर रोजी प्रभाग आरक्षणाचे अंतिम प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहे, अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली.

अनुसूचित जातीकरिता १२ जागा आरक्षित व त्यापैकी सहा जागा महिलांकरिताअनुसूचित जमातीकरिता तीन जागा आरक्षित व त्यापैकी दोन जागा महिलांकरिताइतर मागासवर्गीय प्रवर्गाकरिता ३२ जागा आरक्षित व त्यापैकी १६ जागा महिलांकरिता खुल्या प्रवर्गाकरिता ७५ जागा व त्यापैकी ५० टक्के महिलांकरिता

English
हिंदी सारांश
Web Title : Kalyan-Dombivli: Political futures uncertain despite reservations in upcoming elections.

Web Summary : Despite reservation announcements, Kalyan-Dombivli's political aspirants face uncertainty due to multi-member wards and undefined boundaries. Final ward map expected December 2nd.
टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक