शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोमसापची कल्याण ग्रामीण शाखा स्थापन, अध्यक्ष पदी रवींद्र घोडविंदे यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 21:30 IST

यंदाचे युवा साहित्य संमेलन हे गाेवेलीतील जीवनदीप महाविद्यालयात हाेणार असल्याची घाेषणाही यावेळी करण्यात आली.

 कल्याण - कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कल्याण ग्रामीण शाखेची स्थापना अक्षय तृतीयेच्या दिवशी करण्यात आली. अध्यक्ष पदी रविंद्र घाेडविंदे यांची निवड करण्यात आली आहे. यंदाचे युवा साहित्य संमेलन हे गाेवेलीतील जीवनदीप महाविद्यालयात हाेणार असल्याची घाेषणाही यावेळी करण्यात आली.

मराठी साहित्य आणि भाषेच्या संवर्धनासाठी पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी १९९१ मध्ये सुरू केलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रात विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात. कोकणात जवळपास ६४ शाखा कार्यरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष  रविंद्र घोडविंदे यांच्या संकल्पनेतून कल्याण ग्रामीण भागात साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावे , इथल्या बोली भाषांचे जतन व्हावे , तसेच वाचन , लेखन परंपरा समृद्ध व्हाव्यात म्हणून ६५ व्या कल्याण ग्रामीण शाखेची स्थापना करण्यात आली.

या प्रसंगी कोमसापचे केंद्रिय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, ठाणे जिल्हा अध्यक्ष  बाळा कांदळकर , युवाशक्ती प्रमुख प्रा. दीपा ठाणेकर आदी उपस्थित हाेते. या शाखेच्या अध्यक्ष पदाची धुरा  घोडविंदे यांच्याकडे सोपविण्यात आली. तर कार्याध्यक्ष पदी प्रा. अनिल सुरोशी , कोषाध्यक्ष पदी प्रा. प्रकाश रोहणे असे  १४ जणाचे कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आले. या शाखेत विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी कार्यरत झाली असून शाखेमार्फत विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार सर्वांनी आजच्या स्थापना सभेत केला आहे. या  प्रसंगी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी या वर्षाचे युवा साहित्य संमेलन जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे घेण्याचे जाहीर केले आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणbankबँक